नवी दिल्ली : भारताचे चांद्रयान – 3 मोहीम यशस्वी झाली आहे. चांद्रयान – 3 ने बुधवारी चंद्रावर यशस्वी लँडिंग झाली. यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश झाला आहे. यानंतर देशात जल्लोष केला आणि जगभरातून देखील भारताच्या चांद्रयान – 3 मोहीमेचे कौतुक होत आहे. चांद्रयान – 3 लँडिंग झाल्यानंतर मेरठमध्ये राहणाऱ्या महिलेने मुलाला जन्म दिला. या मुलाचे लोक ‘विक्रम’ असे ठेवण्यात आले. गौरव शर्मा आणि श्वेता शर्मा या दाम्पत्याने त्यांच्या मुलांचे नाव विक्रम लँडरवरून विक्रम ठेवले आहे.
या शर्मा दाम्पत्याचा मुलांचा जन्म हा 23 ऑगस्टच्या सकाळी 7.12 वाजता जन्म झाला. चांद्रयान – 3 ने बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटाने चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. चांद्रयान – 3 यशस्वी होण्याआधीत शर्मा दाम्पत्यांनी मुलांचे नाव विक्रम लँडर वरून ठेवण्याची तयारी केली होती. मुलाचे वडील गौरव शर्मा म्हणत, “विक्रम लँडर चंद्रावर उतरल्याने जगात भारताचे नाव केले. त्याचप्रमाणे माझा मुलगा मोठ्या झाल्यावर देशाचे नाव उंचावेल. यासाठी आम्ही मुलांचे नाव विक्रम असे ठेवले आहे.”
हेही वाचा – Chandrayan 3 चा चंद्रावर फेरफटका; प्रवास करताना सोडणार भारताच्या ‘या’ खुणा
चांद्रयान – 3 हे आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतल्यानंतर सुमारे 4 तासांनी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर चालू लागला आहे. प्रज्ञान रोव्हर हा चंद्रावर चालू लागला आहे, अशी माहिती इस्रोने गुरुवारी ट्वीट करून दिली.
… … and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W
— ISRO (@isro) August 25, 2023
हेही वाचा – भारताचे चंद्रावर मून वॉक! प्रज्ञान रोव्हरचा चंद्रावर फेरफटका
प्रज्ञान रोव्हर पुढील 14 दिवस माहिती पाठवणार
प्रज्ञान रोव्हर पुढील 14 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवार पाणी आणि खनिजांचा शोध घेऊन एकत्र केलेली सर्व माहिती रोव्हर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. चंद्रावरील एक दिवस हा भारतावरील 14 दिवसांच्या बरोबरीचा आहे. चंद्रावर सूर्याचा उजेड असताना म्हणजे दिवसा विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हला सूर्यापासून ऊर्जा मिळत असल्याने जोपर्यंत तेथे सूर्याचा उजेड असेल, तोपर्यंत ते दोघेही कार्यरत असतील. 14 दिवसांनंतर लँडिंग साईटवर अंधार होईल.