Chandrayaan-3 : भारत (India) अवघ्या काही तासांवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. जे काम अमेरिका, चीन आणि रशिया जमले नाही ते काम आता इस्रोचे शास्त्रज्ञ (ISRO) करणार आहेत. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर असणार आहे. परंतु आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे चांद्रयान-3 वेळआधीच उतरणार आहे, अशी माहिती इस्रोने ट्वीट करून दिली आहे. (Chandrayaan 3 to land on the moon ahead of schedule ISRO tweeted the information)
हेही वाचा – Chandrayaan-3 : चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी भारत सज्ज; शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची
इस्रोने ट्वीट करताना म्हटले की, ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) सुरू करण्यासाठी सर्व तयार झाली आहे. चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल (LM) संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्सकडून कमांड प्राप्त केल्यावर लँडर मॉड्यूल पॉवर्ड डिसेंटसाठी थ्रोटल करण्यायोग्य इंजिन सक्रिय करणार आहे.
मिशन ऑपरेशन्स टीम कमांड्सच्या अनुक्रमिक अंमलबजावणीची पुष्टी करत राहील. चांद्रयान-3चे थेट प्रक्षेपण संध्याकाळई 5 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल.
Chandrayaan-3 Mission:
All set to initiate the Automatic Landing Sequence (ALS).
Awaiting the arrival of Lander Module (LM) at the designated point, around 17:44 Hrs. IST.Upon receiving the ALS command, the LM activates the throttleable engines for powered descent.
The… pic.twitter.com/x59DskcKUV— ISRO (@isro) August 23, 2023
इस्रोकडून प्लॅन बी तयार
विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने सर्व तयारी पूर्ण केली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्यामुळे इस्रोकडून सतत निरीक्षण केले जात आहे. आतापर्यंत सर्व काही योजनेनुसार सुरू आहे. विक्रम लँडरचे सर्व भाग व्यवस्थित काम करत आहेत. परंतु काही कारणास्तव आज यशस्वी लँडिंग शक्य झाले नाही तर, इस्रोने प्लॅन बी तयार केला आहे. प्लॅन बीनुसार इस्रो येत्या 27 ऑगस्टला चांद्रयान-3 चे लँडिंग करेल.
हेही वाचा – Chandrayaan 3 बद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? रांचीत लाँचिंग पॅड तर…
4 टप्प्यांत पूर्ण होणार लँडिंग
विक्रम लँडरचे लँडिंग 4 टप्प्यात होणार असून लँडरचा वेग कमी करून ते चंद्राच्या पृष्ठभागावर आणले जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात लँडरचा 30 किमीवरून 7.5 किमी उंचीवर येईल. दुसऱ्या टप्प्यात विक्रम लँडर 7.5 किमी ते 6.8 किमी उंचीवर येईल. तिसऱ्या टप्प्यात 6.8 किमी ते 800 मीटर उंचीवर येईल. चौथ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर 800 मीटर उंचीवर 150 मीटर उंचीपर्यंत येईल.
शेवटची 15 मिनिटे का महत्त्वाची?
अंतराळ तज्ज्ञ प्रोफेसर आरसी कपूर यांनी सांगितले की, चंद्रावर विक्रम लँडरच्या लँडिंगची शेवटची 15 मिनिटे खूप महत्त्वाची असणार आहेत. चांद्रयान-3 जेव्हा पहिल्या टप्प्यात उतरण्यास सुरुवात करेल, तेव्हा त्याचा वेग 1683 मीटर प्रती सेकंद असेल. यानंतर ते 7.4 किमी उंचीपर्यंत खाली आणले जाईल. त्यानंतर लँडरचा वेग 375 मीटर प्रती सेकंद इतका कमी करण्यात येईल. याठिकाणी विक्रम लँडरची उंची निश्चित केली जाईल म्हणजेच ते चंद्राच्या पृष्ठभागावर झुकले जाईल. त्यानंतर विक्रम लँडर 1300 मीटर उंचीवर आणले जाईल. त्यानुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्याचा वेग हळूहळू कमी होईल, नंतर ते 400 मीटर, 150 मीटर आणि नंतर 50 मीटरपर्यंत आणले जाईल. शेवटी 10 मीटरवर आल्यानंतर अंतिम लँडिंग केले जाईल. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्थ करेल तेव्हा विक्रम लँडरचा वेग 2 मीटर प्रती सेकंद इतका असेल, अशी माहिती आरसी कपूर यांनी दिली.
हेही वाचा – Sugar : देशात साखरेची कमतरता नाही, भारतात 330 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज
चंद्राच्या सर्वात धोकादायक ठिकाणी होणार चांद्रयान-3चे लँडिंग
चांद्रयान-3 चे विक्रम लँडरचे लँडिंग चंद्राच्या सर्वात धोकादायक ठिकाणी होणार आहे. नासाच्या माहितीनुसार, चंद्राचा दक्षिण ध्रुव रहस्य, विज्ञान आणि कुतूहलाने भरलेला आहे. त्यामुळे चांद्रयान-3 चे लँडिंगनंतर संपूर्ण जगाला इतिहास घडताना पाहायचा आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप खोल खड्डे आहेत. कोट्यवधी वर्षांपासून या भागात सूर्यप्रकाश पोहोचलेला नाही. येथील तापमान उणे 248 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग गरम करण्यासाठी वातावरण नाही. त्यामुळे इस्रोकडून घाईघाईने पावले उचलली जात आहेत. चांद्रयान-2 दरम्यान झालेली चूक पुन्हा होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.