घरदेश-विदेशChandrayaan-3 update: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होतेय पहाट; लँडर आणि रोव्हरला जागं करण्याचा...

Chandrayaan-3 update: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होतेय पहाट; लँडर आणि रोव्हरला जागं करण्याचा इस्रो करणार प्रयत्न

Subscribe

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्रावर पाठवलेले चांद्रयान-3 मधील लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा सक्रिय करण्याची तयारी सुरू आहे. पण, लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्य करण्यास सक्षम होतील अशी आशा कमी आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्रावर पाठवलेले चांद्रयान-3 मधील लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा सक्रिय करण्याची तयारी सुरू आहे. पण, लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्य करण्यास सक्षम होतील अशी आशा कमी आहे. कारण, लँडर आणि रोव्हर सध्या स्लीप मोडमध्ये गेले आहेत. ते स्लीप मोडमधून उठले आणि पुन्हा कामाला लागले तर ही इस्रोसाठी आनंदाची बाब असणार आहे. चंद्रावर बुधवार ( 20 सप्टेंबर) खूप थंड होता. त्यामुळे आता लँडर आणि रोव्हर दिवस उजाडल्यानंतर आणि त्यांना अधिक उजळ सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर जागे होतील, असं बोललं जात आहे. (Chandrayaan 3 update Dawn breaks out at Moon s South Pole ISRO will attempt to launch the lander and rover)

सौर पॅनेल सूर्यप्रकाशानं चार्ज होणं अपेक्षित आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. या ठिकाणी आज दिवस उजाडेल आणि सूर्यकिरणं येतील. त्यामुळे रोव्हर आणि लँडरचे सोलर पॅनेल चार्ज होतील अशी आशा आहे. रोव्हर आणि लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रो सज्ज आहे.

- Advertisement -

रोव्हरनं 100 मीटर अंतरावर केला प्रवास

चंद्रावर गेल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना महत्त्वाची माहिती पाठवली आहे. या डेटाच्या आधारे चंद्राशी संबंधित विविध प्रकारची माहिती समोर आली आहे. इस्रोनं सांगितलं की प्रज्ञान रोव्हरनं 100 मीटरचं अंतर कापलं आहे. हे अंतर कापण्यासाठी रोव्हरला सुमारे 10 दिवस लागले. इस्रोने सोशल मीडिया साइट ट्वीटरवर लँडर आणि रोव्हरमधील अंतरचा आलेख देखील शेअर केला होता. 6 चाकी प्रज्ञान रोव्हरचं वजन 26 किलो आहे.

चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदा चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचं परीक्षण केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखाद्या देशानं सॉफ्ट लँडिंग केलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा प्रज्ञान रोव्हरनं दिला आहे. त्याशिवाय, इतर धातू आणि ऑक्सिजनचं प्रमाणंही आढळलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -