Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चांद्रयान-3 यशस्वी होणारच, पण 'या' व्यक्तीचा विसर पडता कामा नये; आर माधवनची...

चांद्रयान-3 यशस्वी होणारच, पण ‘या’ व्यक्तीचा विसर पडता कामा नये; आर माधवनची पोस्ट चर्चेत

Subscribe

Chandrayaan-3 मोहिमेला शुभेच्छा आर माधवन याने दिल्या आहेत. तसंच इस्रोचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ असणाऱ्या नंबी नारायणन् यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांनी विकास इंजिनची निर्मिती केली होती.

चांद्रयान-3 हे आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. भारतासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरणार असल्यानं भारतीय नागरिक हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण भारतीय सिनेसृष्टीतूनही अनेक शुभेच्छा येत आहेत. अशातच आर. माधवन याने केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आर. माधवन यांनी चांद्रयान-3 साठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच या व्यक्तीला विसरून चालणार नाही, असंही त्याने म्हटलं आहे. नेमकं आर माधवन काय म्हणाला ते जाणून घेऊया. (Chandrayaan-3 will be a success but Nambi Narayanan person should not be forgotten R Madhavans post in discussion)

आर माधवन म्हणाला की, चांद्रयान-3 ची मोहिम यशस्वी होणारच परंतु यात एका व्यक्तीचं मोठं योगदान आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये, असे माधवन याने ट्वीट करत म्हटले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -

चांद्रयान-3 मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या मोहिमेचा आजचा दिवस हा अत्यंत खास आहे. आज चांद्रयान 3 हे चंद्रावर लँड होणार असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या मोहिमेला शुभेच्छा आर माधवन याने दिल्या आहेत. तसंच, इस्रोचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ असणाऱ्या नंबी नारायणन् यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांनी विकास इंजिनची निर्मिती केली होती.

आर माधवनचा रॉकेट्री सिनेमा

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी आर माधवनचा रॉकेट्री सिनेमा प्रदर्शित झाला होता. आर माधवनने दिग्दर्शित केलेला रॉकेट्री: द नंबी इफेक्ट हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्येष्ठ वैज्ञानिक नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. नम्बी नारायणन यांचा ISRO ची प्रवास आणि त्यांचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

( हेही वाचा: Chandrayaan-3चे थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्ये हवे; भारताविरुद्ध बोलणाऱ्या पाकच्या माजी मंत्र्याची मागणी )

- Advertisment -