मुंबई : भारताचे चांद्रयान -3 चांद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्रावर उतरण्याची भारताची चांद्रयान – 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भारताच्या चांद्रायान – 3 मोहीमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. यात पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी चांद्रायान – 3 मोहिमेचे पाकिस्तानमध्ये थेट प्रक्षेपण दाखवावे, अशी मागणी ट्वीट करत केली आहे. यापूर्वी भारताचे चांद्रयान – 2 मोहीम अयशस्वी झाली होती. यानंतर पाकिस्तामध्ये जल्लोष साजरा केला होता. तेव्हा फवाद चौधरी यांनी भारताच्या चांद्रयान – 2 मोहिमेवरी वादग्रस्त वक्तव्य देखील केले होते. पण फवाद चौधरींच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या लोकांनी त्यांच्यावर टीका करत घरचा आहेर दिला होता आणि आतात चांद्रयान -3 पाकिस्तानमध्ये थेट प्रक्षेपण करण्याची मागणी फवाद चौधरींनी केली आहे.
Pak media should show #Chandrayan moon landing live tomorrow at 6:15 PM… historic moment for Human kind specially for the people, scientists and Space community of India…. Many Congratulations
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) August 22, 2023
पाकिस्तानची अंतराळ संस्था ही भारताच्या आधी सुरू झाली होती. पण भारताची अंतराळ संस्था ‘इस्रो’ने मंगळ आणि चंद्रावर पोहोचली आहे. आता भारताची अंतराळ संस्था इस्रो आणि पाकिस्तानच्या अंतराळ संस्थेची तुलना देखील होऊ शकत नाही. अशी कामगिरीही भारताच्या इस्रोने केली आहे. फवाद चौधरी म्हटले, “चांद्रयान – 3 हे सायंकाळी 6.15 वाजता चंद्रावर लँडिंग होणार आहे. यामुळे पाकिस्तानी मीडियाने चांद्रयान – ३ थेट प्रक्षेपण करण्यात यावे. हा एक ऐतिहासिक क्षण असून विशेष करून भारत आणि शास्त्रज्ञांसाठी आजचा दिवसखूप मोठा आहे”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
हेही वाचा – Chandrayaan 3 बद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? रांचीत लाँचिंग पॅड तर…
भारताच्या चांद्रयान – 2 अयशस्वी झाल्यावर संपूर्ण देश निराश झाला होता. पण पाकिस्तानमध्ये चांद्रयान – 2 अयशस्वी झाल्यावर आनंद साजरा केला होता. यावेळी तत्कालनी तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरींनी वादग्रस्त केले होतेच. पण चांद्रयान – 2 च्या अयशस्वी झाल्यावर जल्लोष देखील साजरा केला होता. “भारताला जे काम येत नाही. ते काम करण्याची गरज नव्हती”, असे ट्वीट फवाद चौधरींने केले होते. चांद्रयान – २ अयशस्वी झाले होते, तेव्हा फवाद चौधरी हे पाकिस्तानच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि आता फवाद चौधरी हे सत्तेत नसल्याने त्यांची भूमिका बदलेली आहे.