घर देश-विदेश Chandrayaan-3: चांद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूलचं चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरने केलं स्वागत,...

Chandrayaan-3: चांद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूलचं चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरने केलं स्वागत, इस्रोने दिली नवी अपडेट

Subscribe

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचं लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी (२३ ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे इस्रोने म्हटले आहे. चंद्राच्या दिशेने जाणाऱ्या चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलशी चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने संपर्क साधला आहे.

नवी दिल्ली: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचं लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी (२३ ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे इस्रोने म्हटले आहे. चंद्राच्या दिशेने जाणाऱ्या चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलशी चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने संपर्क साधला आहे.

इस्रोने सोमवारी (21 ऑगस्ट) ट्विट करून याबाबत माहिती दिली. इस्रोने लिहिले, “स्वागत आहे मित्रांनो – चांद्रयान-2 ऑर्बिटरने चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलचे औपचारिक स्वागत केले आहे. दोघांमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित झाला आहे. आता लँडर मॉड्यूलच्या संपर्कात राहण्याचे आणखी मार्ग आहेत. लँडिंगचे थेट प्रक्षेपण सुरू बुधवारी संध्याकाळी 5:20 वाजता सुरू होईल, अशी माहिती देखील इस्रोने दिली आहे. (Chandrayaan-3s lander module received by Chandrayaan-2 s orbiter ISRO gives new update)

- Advertisement -

भारताचे चांद्रयान-2 लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना 2019 मध्ये क्रॅश झालं. त्यामुळे चांद्रयान-2 चं ऑर्बिटर 2019 पासून चंद्राभोवती फिरत आहे आणि त्याने चांद्रयान-3 मोहिमेला खूप मदत देखील केली आहे.

चांद्रयान-2 ऑर्बिटर लँडर मॉड्यूलशी संवाद साधत आहे. याद्वारे ग्राऊंड स्टेशनपर्यंतही सिग्नल पोहोचेल. चांद्रयान-2 ऑर्बिटरने चांद्रयान-3 लँडरसाठी सुरक्षित लँडिंग साइट ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

चांद्रयान-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आलं

- Advertisement -

इस्रोने सोमवारी लँडरच्या LHDAC कॅमेऱ्यात टिपलेली चंद्राची अनेक छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. चांद्रयान-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आलं होतं आणि या यानाचं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याचं उद्दिष्ट आहे.

इस्रोचे माजी संचालक के सिवन यांनी या मोहिमेबद्दलची माहिती दिली. गेल्या चांद्रयान -2 मोहिमेतील अपयशातून धडा घेत आम्ही पावले उचलली. त्याचे परिणाम दिसत आहेत. आता हे अंतराळयान खूप चांगले काम करत आहे. या मोहिमेच्या यशासाठी आम्ही केलेले बदल खूप फायदेशीर ठरले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

आम्ही मागील मोहिमेतील लँडिंग प्रक्रियेनंतरच्या डेटाचा अभ्यास केला. त्याच्या आधारे या मोहिमेत सुधारणा केल्या आहेत. आम्ही ज्या काही सुधारणा केल्या होत्या. इतकेच नव्हे, आणखीही काही सुधारणा त्यात करण्यात आल्या आहेत. जिथे मार्जिन कमी होती, तिथे आम्ही ती मार्जिन वाढवली ​​आहे… चांद्रयान -2पासून धडा घेत, आम्ही पावले उचलली आणि त्याआधारे सिस्टीम अधिक मजबुतीने प्रगती करत आहे, असे के. सिवन यांनी सांगितले.

( हेही वाचा: Chandrayaan-3 : गेल्या मोहिमेच्या अपयशातून शिकलो अन्… इस्रोच्या माजी संचालकांनी दिली माहिती)

- Advertisment -