Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे 'त्या' ब्रिटिश पत्रकाराचे तोंड झाले बंद

Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे ‘त्या’ ब्रिटिश पत्रकाराचे तोंड झाले बंद

Subscribe

बीबीसी या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने चांद्रयान-3 अवकाशात झेपावल्यानंतर भारतातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्येवर भाष्य केले होते. ज्यामुळे या मोहीमेच्या यशस्वीतेनंतर त्या पत्रकाराला ट्रोल करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘ISRO’ ने केलेल्या अभुतपूर्व अशा कामगिरीमुळे जगभरात भारताची मान उंचावली आहे. इस्रोने चांद्रयान-3 हे यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड केरून मोठा इतिहास रचला आहे. 23 ऑगस्ट 2023 हा दिवसाच्या भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. काल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या भुपृष्ठावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या लँड झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार भारत हा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे या मोहीमेत सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे विशेष असे कौतुक करण्यात येत आहे. प्रत्येक भारतीय या मोहीमेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट करत होता. विदेशातील मंत्री, नेते, राष्ट्राध्यक्षांकडून देखील भारताला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पण या सर्वात चर्चा करण्यात येत आहे ती एका ब्रिटिश पत्रकाराची. कारण चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे या पत्रकाराला मोठी चपराक बसल्याचे बोलले जात आहे. (Chandrayaan-3’s successful landing shuts down ‘that’ British journalist)

हेही वाचा – Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर अभिनेता प्रकाश राज झाले ट्रोल, वाचा…

- Advertisement -

बीबीसी या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने चांद्रयान-3 अवकाशात झेपावल्यानंतर भारतातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्येवर भाष्य केले होते. भारतात 70 कोटी जनतेला शौचालय नसतानाही तुम्ही चांद्रयान मोहिमेवर पैसे खर्च करत आहात, असा खोचक प्रश्न या पत्रकाराने उपस्थित केला होता. ज्याचे उत्तर देण्यात आले होते. परंतु आता ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्याचे तोंडच बंद झाले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, ब्रिटिशचे हाय कमिशनर असलेले एलेक्स एलिस यांनीच भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर हिंदी भाषेत ट्वीट करत भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामुळे ही एक मोठी चपराक त्या ब्रिटिश पत्रकाराला त्यांच्याच व्यक्तीने लगावल्याचे बोलले जात आहे. “हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी अतिशय मोठा क्षण आहे, अभिनंदन” असे एलेक्स एलिस यांच्याकडून ट्वीट करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर या ब्रिटिश पत्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या पत्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारताचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. तसेच, त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “खरंच?? आमच्या देशात असलेली गरिबी, तुम्ही लादलेल्या अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीचा परिणाम होती. या राजवटीने संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली. आमच्याकडून लुटलेली सर्वात मौल्यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा अभिमान आणि आमच्या क्षमतेवर असलेला विश्वास होता.”

- Advertisment -