Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सपासून चंद्रावर तयार होतंय पाणी; Chandrayaan-1च्या डेटामधून खुलासा

पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सपासून चंद्रावर तयार होतंय पाणी; Chandrayaan-1च्या डेटामधून खुलासा

Subscribe

Chandrayaan-1 पृथ्वीमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होत आहे. चांद्रयान-१ च्या डेटाच्या केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. नुकतेच नेचर अॅस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की पृथ्वीचे ऊर्जा इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास मदत करत आहेत.

Chandrayaan-1 पृथ्वीमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होत आहे. चांद्रयान-१ च्या डेटाच्या केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. नुकतेच नेचर अॅस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की पृथ्वीचे ऊर्जा इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास मदत करत आहेत. इस्रोची चंद्र मोहीम चांद्रयान-1 ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा शोध घेतला होता. (Chandrayaan Water is formed on the Moon from Earth s electrons Revealed from Chandrayaan 1 data)

आता पृथ्वीमुळेच चंद्रावर पाणी तयार होत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. याचे कारण पृथ्वीवरून जाणारे ऊर्जा इलेक्ट्रॉन आहे. अमेरिकेतील मानोवा येथील हवाई विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा खुलासा केला आहे. संशोधनात असे समोर आले आहे की पृथ्वीभोवती असलेल्या प्लाझ्माच्या शीटमुळे चंद्राचे दगड वितळत राहतात, ज्यामुळे खनिजे तयार होतात. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागाचे हवामान आणि वातावरणही बदलत असते.

- Advertisement -

नेचर अॅस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रॉन्समुळे पाणी तयार होत आहे. तथापि, शास्त्रज्ञांना चंद्राच्या पृष्ठभागावर किती पाणी आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. एवढेच नाही तर त्याबद्दल जाणून घेणेही खूप अवघड आहे. यामुळेच चंद्रावर पाण्याची उत्पत्ती होण्याचे कारण कळू शकलेले नाही.

पाण्याचे प्रमाण जाणून घेणं मोठे यश असेल

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर हे समजले की चंद्रावर पाणी कसे आणि कुठे सापडेल किंवा तेथे किती वेगाने पाणी निर्माण करता येईल, ते भविष्यात तेथे मानवी वस्ती उभारण्यास मदत करणार ठरेल. 2008 मध्ये चंद्रावर पाठवण्यात आलेल्या चांद्रयान-1 या चांद्र मोहिमेच्या एका उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण असल्याची माहिती दिली होती. ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती. सौर वाऱ्यामध्ये उच्च ऊर्जा कण असतात जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. जे चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने हल्ला करत असतात. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ या प्रक्रियेला जबाबदार मानतात. एवढेच नाही तर चंद्रावरील हवामानात बदलही त्यामुळेच घडतात. यासोबतच जेव्हा सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जातो तेव्हा तो चंद्राचे संरक्षण करतो.

- Advertisement -

सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश फोटॉनपासून पृथ्वी चंद्राचे संरक्षण करण्यास सक्षम नाही. याबाबत सहाय्यक संशोधक शुई ली यांनी सांगितले की, आम्हाला चंद्रावर एक नैसर्गिक प्रयोगशाळा सापडली आहे. आम्ही या प्रयोगशाळेतूनच त्याचा अभ्यास करतो. ते म्हणाले की, येथून आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होण्याची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून किंवा मॅग्नेटोटेलमधून बाहेर येतो तेव्हा सूर्याच्या उष्ण वाऱ्यांचा जास्त हल्ला होतो. जेव्हा ते मॅग्नेटोटेलच्या आत असते तेव्हा त्यावर सौर वाऱ्यांचा क्वचितच हल्ला होतो. अशा स्थितीत पाणी तयार होण्याची प्रक्रिया जवळपास थांबते.

आम्ही तुम्हाला सांगतो की शुई ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चांद्रयान-1 मधून मिळवलेल्या मून मिनेरॉलॉजी मॅपर उपकरणाच्या डेटाचा अभ्यास केला. त्यांनी 2008 ते 2009 दरम्यानच्या डेटावर संशोधन केले. ज्यामध्ये असे आढळून आले की पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमुळे चंद्रावरील पाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया वेगवान किंवा कमी होते. म्हणजे मॅग्नेटोटेलचा चंद्रावर पाणी बनवण्याच्या प्रक्रियेत थेट सहभाग नाही. मात्र, त्याचा खोलवर परिणाम होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या महिन्यातच भारताला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपली मोहीम पाठवण्यात कोणत्याही देशाला यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(हेही वाचा: ‘वंदे भारत’नंतर सर्वसामान्यांसाठी आता धावणार ‘वंदे साधारण’; प्रवास भाडे येणार आवाक्यात )

- Advertisment -