Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayan 3 : चंद्रावरून आला रोव्हर 'प्रज्ञान'चा पहिला फोटो; INSPACE च्या अध्यक्षांनी...

Chandrayan 3 : चंद्रावरून आला रोव्हर ‘प्रज्ञान’चा पहिला फोटो; INSPACE च्या अध्यक्षांनी केला शेअर

Subscribe

Chandrayan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यासह भारत (India) हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. दरम्यान, रोव्हर बाहेर पडतानाचे फोटो आता समोर आले आहेत. INSPACE चे अध्यक्ष पवन के गोयंका (Pawan K Goenka) यांनी ट्वीट करत फोटो शेअर केला आहे. (Chandrayan 3 First photo of Moon rover Pragyan Shared by President of INSPACE)

हेही वाचा – Chandrayan 3 : भारताचं चंद्रावर Moon Walk; इस्रोने ट्वीट करत दिली माहिती

- Advertisement -

भारताचे ‘चांद्रयान-3’चे लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर त्याठिकाणी अभ्यास करण्यासाठी रोव्हर ‘प्रज्ञान’ देखील रॅम्पद्वारे लँडरमधून बाहेर पडले आहे. सध्या ते चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ‘विक्रम’ लँडरचा स्पर्श झाल्यानंतर काही तासांनी रोव्हर बाहेर पडत असल्याचे चित्रात दिसते. रॅम्पवर लँडरवरून उतरलेल्या रोव्हरचे पहिले छायाचित्र INSPACE चे अध्यक्ष पवन के गोयंका यांनी ट्वीटरवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – Chandrayan 3 बाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याचे अज्ञान; लोकांनी लावला डोक्याला हात, युझर्सनी केले ट्रोल

लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरले

- Advertisement -

‘चांद्रयान-3’ अंतराळ यानामध्ये एक प्रोपल्शन मॉड्यूल (वजन 2,148 किलो), लँडर (वजन 1,723.89 किलो) आणि रोव्हर (वजन 26 किलो) यांचा समावेश आहे. यापैकी फक्त लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरले आहे. रोव्हरच्या बाहेर पडल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने त्याच्या लँडरसह एक संपर्क दुवा देखील स्थापित केले आहे. जे आता चंद्राविषयी माहिती गोळा करण्यास सक्षम असेल. ‘चांद्रयान-3’ लँडर आणि MOX-ISTRAC इस्रोचे बेंगळुरू येथील संपर्क केंद्र यांच्यात संपर्क दुवा स्थापित झाला आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

हेही वाचा – ISRO : ‘चांद्रयान-3’ ने इतिहास रचताना लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोडला रेकॉर्ड; एवढ्या लोकांनी पाहिले यशस्वी लँडिंग

‘चांद्रयान-3’ साठी ‘चांद्रयान-2’ चे ऑर्बिटर बॅकअप कम्युनिकेशन चॅनेल

‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोने म्हटले की, ‘चांद्रयान-3’ प्रोपल्शन मॉड्यूलसाठी प्राथमिक संप्रेषण चॅनेल ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC), बेंगळुरूमधील मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स असणार आहे, जे लँडर आणि रोव्हरशी संवाद साधतील. याशिवाय ‘चांद्रयान-3’ने 2019 पासून चंद्राभोवती फिरत असलेल्या ‘चांद्रयान-2’ मिशनच्या ऑर्बिटरशी संपर्क स्थापित केला आहे. इस्रोने असेही म्हटले की, मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समध्ये आता लँडरशी संवाद साधण्यासाठी अधिक चॅनेल आहेत. याशिवाय ‘चांद्रयान-2’ ऑर्बिटर हे लँडरसह इस्रोसाठी बॅकअप कम्युनिकेशन चॅनेल असणार आहे.

- Advertisment -