घर देश-विदेश Chandrayan-3 : असा होता चांद्रयान-3 मोहिमेचा प्रवास; वाचा-कधी काय घडले?

Chandrayan-3 : असा होता चांद्रयान-3 मोहिमेचा प्रवास; वाचा-कधी काय घडले?

Subscribe

14 जुलै रोजी प्रक्षेपित झालेल्या यानाच्या प्रवासापासून आजच्या सुवर्ण क्षणापर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊया.

नवी दिल्ली : जय हो…अखेर भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वीरित्या पाऊ ठेवले आहे. चांद्रयान-3 याच्या यशस्वी लॅंडिंगनंतर संपूर्ण देशवासीयांनी आनंदोत्सव केला असून, इस्रोमधील वैज्ञानिकांनीही या मोहिमेच्या यशस्वीतेचा आनंद साजरा केला आहे. मात्र, लॅंडिंगची शेवटची ती 15 मिनिटं प्रत्येक भारतीयांच्या ऱ्हदयाचे ठोके चुकविणारी अशीच होती. मात्र आज जरी आपण या चांद्रयान-3 च्या यशस्वीतेचा आनंदोत्सव साजरा करत असलो तरी 14 जुलै रोजी प्रक्षेपित झालेल्या यानाच्या प्रवासापासून आजच्या सुवर्ण क्षणापर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊया.(Chandrayan-3  Such was the journey of Chandrayan3 mission Read-what ever happened?)

हेही वाचा : चंद्र आला कवेत; भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग

असा राहला चांद्रयान-3 चा प्रवास

- Advertisement -

इस्रोने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित केले आणि ते पृथ्वीभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत टाकले.
15 जुलै रोजी, इस्रोने पृथ्वीच्या दिशेने अंतराळ यानाला पुढे नेण्यासाठी पहिली प्रक्रिया पूर्ण केली.
1 ऑगस्ट रोजी चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून चंद्राच्या कक्षेकडे वळले.
5 ऑगस्ट रोजी या वाहनाने चंद्राच्या पहिल्या 40 हजार किमीच्या कक्षेत प्रवेश केला.
6 ऑगस्ट रोजी त्याने दुसऱ्या 20,000 कक्षेत प्रवेश केला.
9 ऑगस्ट रोजी तिसरी कक्षा बदलून 5 हजार किमीच्या कक्षेत प्रस्थापित झाली आणि त्यानंतर 14 ऑगस्टला 1 हजार किमीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
16 ऑगस्ट रोजी कक्षा बदलून, ते चंद्राच्या सर्वात जवळच्या 100 किमीच्या कक्षेत स्थापित केले गेले.
17 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले. लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकत आहे.
18 ऑगस्ट रोजी, विक्रम लँडर डीबूस्टिंग प्रक्रियेतून गेला, जो यशस्वी झाला.
20 ऑगस्ट रोजी, लँडरने दुसऱ्यांदा डीबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आणि चंद्राच्या अगदी जवळ पोहोचला.
23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:40 वाजता विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला.

हेही वाचा : Chandrayaan-3 : ध्येय गाठले; चंद्रावर लँडिंगनंतर चांद्रयान-3ने पाठवला पहिला संदेश

विक्रम लँडरचे हे आहेत वैशिष्ट्य

- Advertisement -

विक्रम लँडर हे एक अतिशय खास आणि उपयुक्त अंतराळयान आहे. यामध्ये चंद्रावरील प्लाझ्मा, पृष्ठभागावरील उष्णता, पाण्याची अपेक्षित उपस्थिती, भूकंप आणि चंद्राची गतिशीलता यांचा अभ्यास करणारी उपकरणे आहेत.

- Advertisment -