घर देश-विदेश Chandrayan : भारतापाठोपाठ 'या' देशानेही पाठविले चंद्रावर यान; म्हणे चंद्रावर शोधणार पाणी

Chandrayan : भारतापाठोपाठ ‘या’ देशानेही पाठविले चंद्रावर यान; म्हणे चंद्रावर शोधणार पाणी

Subscribe

रशियाने 47 वर्षांनंतर शुक्रवारी चंद्रावर  अंतराळ यान पाठवले आहे. तर या चंद्रयान मिशनसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रोने) रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण धृवावर भारताने चंद्रयान-3 (Chandrayaan-3) पाठवले असून, 14 जुलै रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO)ने चंद्रयानाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर प्रत्यक्ष लॅंडींग करणार आहे. मात्र,आता भारतापाठोपाठ रशियानेसुद्धा त्यांचे लुना-25 अंतराळयान प्रक्षेपीत (Russia also launched its Luna-25 spacecraft) केले असून, हे यान 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंड होणार असल्याची माहिती आहे. तर हे यान चंद्रवार पाणी आहे की, नाही हे शोधणार असल्याचा दावा रशियाच्या स्पेस एजन्सी रस्कासमझने केले आहे.(Chandrayan: After India, ‘this’ country also sent a spacecraft to the moon; They say they will find water on the moon)

रशियाने 47 वर्षांनंतर शुक्रवारी चंद्रावर  अंतराळ यान पाठवले आहे. तर या चंद्रयान मिशनसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रोने) रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर इस्रोने असेही म्हटले की, भारताची चंद्रयान -3 आणि रशियाचा लुना-25 हे दोन्ही मिशन आपले लक्ष साध्य करुन यशस्वी होणार आहेत. मात्र, रशियाच्या या अंतराळ मोहीमेबाबत अधिक माहिती करुन घेणे गरजेचे आहे. कारण, भारताचे चंद्रयान-3 आणि रशियाचे लुना-25 यामध्ये काय अंतर आहे हे समजून घेऊया.

काय आहे लूना-25 मिशन?

- Advertisement -

रशियाची अंतराळ संशोधन संस्था रस्कासमझने शुक्रवारी त्यांचे लूना-25 अंतराळ यान प्रक्षेपित केले. हे यान मॉस्कोच्या पूर्वेला सुमारे 5 हजार 550 किलो मीटर अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथून स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी प्रक्षेपित केले. लुना-25 हे सोयुझ 2.1बी रॉकेटमध्ये पाठवण्यात आले आहे. त्याला लुना-ग्लोब मिशन असे नाव देण्यात आले आहे. किटची लांबी सुमारे 46.3 मीटर आहे आणि त्याचा व्यास 10.3 मीटर आहे. यानंतर 313 टन वजनाचे रॉकेट 7 ते 10 दिवस चंद्राभोवती फिरणार आहे.

हेही वाचा : राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवणाऱ्या न्यायाधीशींची झाली बदली, काय आहे प्रकरण?

चंद्रयान-3 च्या आधी पोहचणार लुना-25

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने पाठवलेले लुना-25 हे अंतराळ यान 21 किंवा 22 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. तर भारताचे चंद्रयान-3 हे अंतराळ याने 14 जुलै रोजी प्रक्षेपित झाले होते ते 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार आहे. जर भारताचे चंद्रयान-3 हे यान चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीरित्या उतरले तर ते रशियानंतर दक्षिण धृवावर उतरणारा दुसरा देश ठरणार आहे.

हेही वाचा : ‘तुम्ही परत याल तर पंतप्रधान बनूनच या’; राहुल गांधींना ‘कोणत्या’ गावातील लोकांनी म्हटले असे,वाचा-

रशियाने याआधी 1976 मध्ये पाठवले होते यान

रशियाने याआधी 1976 मध्ये लुना-24 चंद्रावर उतरवले होते. जगात आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तापर्यंत पोहोचल्या आहेत. लूना-25 यशस्वी झाल्यास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर देश उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल. लुना-25 आणि चांद्रयान-3 ची लँडिंगची वेळ जवळपास सारखीच असेल. काही तास आधी लूना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

- Advertisment -