घरदेश-विदेश1st April 2022 : निर्बंधमुक्ती, टॅक्स बदल; जाणून घ्या 1 एप्रिलपासून काय...

1st April 2022 : निर्बंधमुक्ती, टॅक्स बदल; जाणून घ्या 1 एप्रिलपासून काय बदलणार?

Subscribe

आजपासून देशाचे नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरु झाले आहे. मात्र या नव्या आर्थिक वर्षापासून अनेकांच्या आर्थिक व्यवहारात मोठे बदल होणार आहेत. अगदी गॅस सिलिंडरच्या किंमतींपासून टॅक्सच्या दरापर्यंत वाढ होणार आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. यात विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने हा मोठा बदल केला आहे. यात आज महत्वाचे म्हणजे आजपासून आयकर नियमांमध्येही मोठी बदल होत आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आयकर नियम 2021 अंतर्गत देशात आयकर नियमांत मोठे बदल होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक गोष्टींवर भरावा लागणाऱ्या टॅक्सच्या दरात देखील बदल होत आहे.

आजपासून महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध हटले

आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त फिरता येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून राज्यात गेल्या दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना आता गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार आहे. हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्था, लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रा यासाठी उपस्थितीची मर्यादा नाही. बस, लोकल रेल्वे प्रवास. सार्वजनिक ठिकाण, मॉल, उद्याने याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. तसेच उद्योग आणि व्यवसायांवरील सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. पण सोशल डिस्टन्सिंग कायम असेल.

- Advertisement -

औषधांच्या दरात वाढ

1 एप्रिलपासून देशात पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. कारण केंद्राने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यात मान्य दिली आहे. यामुळे सुमारे 800 औषधकांच्या किंमतीत वाढ होणार आहे.

जीएसटी नियमात बदल

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (CBIC) वस्तू आणि सेवा कर ( GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आता याचा फटका सहन करावा लागणार आहे.

- Advertisement -

क्रिप्टोकरन्सीच्या नियमांत बदल

क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आता देशात कर लागू होणार आहे. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) किंवा क्रिप्टोकरन्सी विकून मिळालेल्या नफ्यावर 30 टक्के कर लागणार आहे.

घर खरेदी महागणार

केंद्र सरकराने 1 एप्रिल 2022 पासून घर खरेदी करणाऱ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80EEA मध्ये बदल केला आहे. यामुळे नागरिकांना घर खरेदी करताना मिळणारी सवलत बंद होणार आहे.

गॅसच्या दरात वाढ

इंधन दरवाढीमुळे आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील मोठी वाढ सुरु आहे. मार्चमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली होती. 1 एप्रिल रोजी नवीन दर जाहीर होण्याची शक्यता आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे नियम बदलले

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे आता चेक, बँक ड्राफ्ट किंवा रोखीने देता येणार नाहीत. त्यामुळे आजपासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना युपीआय अथवा नेटबँकिंगचा वापर करावा लागणार आहे.

वाहने महागणार

वाहन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढणार आहे. तर मर्सिडीज- बेंझ इंडियानेही किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. तर टोयोटाने 4 टक्क्यांनी आणि BMW ने 3.5 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल

दरम्यान 1 एप्रिलपासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध होणार आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्याजाचे पैसे रोखीने आता मिळणार नाहीत. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.


मास्क सक्ती मागे! 2 वर्षांनी कोरोना निर्बंधातून महाराष्ट्र मुक्त


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -