नवी दिल्ली : वर्षाच्या सरत्या म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सिम कार्ड खरेदी -विक्रीच्या नियमात केंद्र सरकार बदल करणार आहे. तेव्हा हे बदलणारे नियम एकदा जाणून घेणे गरजेचे आहेत. (Changes in purchase and sale of SIM cards from December 1 How is that find out)
1 डिसेंबरपासून केंद्र सरकार सिमकार्ड खरेदीच्या नियमात बदल करणार आहे. हे नियम आधी 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू केले जाणार होते, परंतू सरकारने आता ते दोन महिने वाढवून 1 डिसेंबरपासून लागू करण्याची तयारी केली आहे. जर तुम्ही सिम डीलर किंवा सिम कार्ड खरेदी करणार असाल तर तुम्हाला या नियमांची संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्ही नंतर अडचणीत येऊ शकता एवढे मात्र खरे.
बदल करण्यात येणाऱ्या नवीन नियमानुसार, सिम कार्ड विकणाऱ्या डीलर्सना त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. याशिवाय सिम विकण्यासाठी नोंदणीही आवश्यक असेल. व्यापाऱ्यांच्या पोलीस पडताळणीची संपूर्ण जबाबदारी टेलिकॉम ऑपरेटरची असेल. या नियमांकडे दुर्लक्ष करून कोणी सिम कार्ड विकल्यास त्या विक्रेत्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. शासनाने व्यापाऱ्यांना पडताळणीसाठी 12 महिन्यांची मुदत दिली आहे. जर एखाद्या ग्राहकाला त्याच्या जुन्या नंबरवर नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल तर त्यावर छापलेला QR कोड स्कॅन करून त्याचा डेमोग्राफिक डेटा देखील गोळा केला जाईल.
हेही वाचा : RAJASTHAN ELECTIONS 2023 : महिलांना दरवर्षी 10,000 रुपये; काँग्रेसचा तीन मुद्द्यांवर भर
या बदलत्या नियमाकडेही द्या लक्ष
नव्या नियमानुसार आता मोठ्या प्रमाणात सिम कार्ड जारी केले जाणार नाहीत. यासाठी सरकारने व्यवसाय जोडणीची तरतूद सुरू केली आहे. तथापि, तुम्ही पूर्वीप्रमाणेच एका ओळखपत्रावर 9 सिम कार्ड खरेदी करू शकता. याशिवाय एखाद्या व्यक्तीने आपले सिमकार्ड बंद केले तर तो क्रमांक 90 दिवसांनंतरच दुसऱ्या ग्राहकाला दिला जाईल.
हेही वाचा : Kapil Dev : विश्वचषक सामन्याचे आमंत्रण नाही, पण पराभवानंतर कपिल देव यांचा भारतीय संघाला…
हा आहे नवीन नियमामागील उद्देश
नव्या नियमाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सायबर फ्रॉड, घोटाळा आणि फसवणूक कॉल्स रोखण्याच्या उद्देशाने सरकारने सिमकार्डसाठी नवीन नियम जारी केले आहेत. ते म्हणाले की फसवणूक कॉल थांबवण्यासाठी सुमारे 52 लाख कनेक्शन ब्लॉक करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सीम विकणाऱ्या 67 हजार डीलर्सवर सरकारने बंदी घातली असल्याचेही केंद्रीय मंत्री म्हणाले.