घरताज्या घडामोडीकेंद्राला राष्ट्रपती राजवट लागू करून पंजाबवर राज्य करायचंय, मुख्यमंत्री चन्नींचा आरोप

केंद्राला राष्ट्रपती राजवट लागू करून पंजाबवर राज्य करायचंय, मुख्यमंत्री चन्नींचा आरोप

Subscribe

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. पंतप्रधानांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करून पंजाबवर राज्य करू पाहतंय, असा आरोप चन्नींनी केंद्र सरकारवर केला आहे. जर राज्यात गोळीबार झाला तर पहिली गोळी मी अंगावर घेईन. चरणजीत सिंह यांनी केंद्र सरकारवर आरोप करत या घटनेला ज्या प्रकारे दाखवलं जातंय त्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं चन्नी म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लागू करून पंजाबवर राज्य करण्याचा प्रयत्न

एका हिंदी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, पंतप्रधानांना हेलिकॉप्टरमधून यायचं होतं. परंतु अचानक त्यांनी आपला मार्ग बदलला. आमच्या अधिकाऱ्यांना नोटीस दिल्या जात आहेत. जर पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसेल तर त्यांना नोटीस का दिली जात आहे. मुख्य सचिव आणि डीजीपी यांना केंद्र सरकारकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्र सरकार निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून पंजाबवर राज्य करू पाहते, असा आरोप चन्नींनी केला आहे.

- Advertisement -

पंजाबची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

पंजाब आणि पंजाबमधील लोकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोप-प्रत्यारोप करत राहिल्यास अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर चन्नी म्हणाले की, त्या दिवशी नक्की काय घडलं, चुकी कोणाची होती आणि सुरक्षेची जबाबदारी कोणी घेतली पाहीजे होती?, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले

आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे आम्ही लोकांपासून थोडीचं लांब पळतोय. अचानक कोणत्याही कारणामुळे लोकं तुमच्या समोर आली असतील आणि पंतप्रधानांचा ताफा एक किलोमीटरपर्यंत आधीच परतला असेल, तर जीवाला कसा काय धोका निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांना हे माहितीही नव्हतं की, पंतप्रधानांचा ताफा याच मार्गाने येणार आहे. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, असं चन्नी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : PM Modi Security Lapse : हा शेतकऱ्यांचा रोष आहे का?, मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीवर राकेश टिकैत यांचा सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -