HomeElection 2023Chauhan Vs KamalNath : 'भलेही विरोधात असलो तरी विकासासाठी सोबत'; कमलनाथांची प्रतिक्रिया

Chauhan Vs KamalNath : ‘भलेही विरोधात असलो तरी विकासासाठी सोबत’; कमलनाथांची प्रतिक्रिया

Subscribe

सोमवारी दुपारी कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांनी शिवरााज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काही वेळानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

भोपाळ : मध्य प्रदेशात भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, राज्यात आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. असे असतानाच आज सोमवार (4 डिसेंबर) रोजी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच या भेटीमागील कारण स्वतः कमलनाथांनी सांगितल्यानंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला. (Chauhan Vs Kamal Nath Even if we are against together for development KamalNaths reaction)

सोमवारी दुपारी कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांनी शिवरााज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काही वेळानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो होतो तेव्हा तेसुद्धा माझे अभिनंदन करण्यासाठी आले होते. या भेटीत मी त्यांना विश्वास दिला की, आम्ही विरोधी पक्षात तर नक्कीच राहू, परंतू मध्य प्रदेशच्या विकासासाठी आणलेल्या योजनांच्या समर्थनार्थ आम्ही तुमच्या सोबत असेही त्यांना सांगितले असल्याचे कमलनाथांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Mizoram Assembly Election Result 2023 : इंदिरा गांधीचे सुरक्षा प्रमुख CM पदाच्या शर्यतीत सर्वात…

मध्य प्रदेशात अनेक समस्या

या भेटी दरम्यान कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान यांना भेटल्यानंतर राज्यातील विविध समस्या संदर्भातही चर्चा केल्याची माहिती मीडियाला दिली. ते म्हणाले की, आज राज्यात एक ना अनेक समस्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती, बेरोजगारीची, कृषी विभागाची आहे. तेव्हा या समस्या सोडविताना राज्याची आर्थिक वाटचाल सुरू राहली पाहीजे यासाठी आम्ही तुमच्या सोबतच असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.