Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशCheating in Love : प्रेमात उधळले 80 लाख अन् प्रेयसी गेली जुन्या प्रियकरासोबत..., तरुणाच्या तक्रारीने पोलीस संभ्रमात

Cheating in Love : प्रेमात उधळले 80 लाख अन् प्रेयसी गेली जुन्या प्रियकरासोबत…, तरुणाच्या तक्रारीने पोलीस संभ्रमात

Subscribe

विवेक जेव्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला, तेव्हा, या प्रकरणी कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा याबद्दल पोलीस संभ्रमात होते. पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली. त्यात आस्थाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन विवेकची फसवणूक केल्याचे आढळले.

भोपाळ : प्रेमामध्ये आणा-भाका घेत असताना अगदी चंद्र-तारे आणण्यापर्यंत मजल जाते. पण मध्य प्रदेशातील रेवा येथे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. प्रेयसीने प्रिकराला इतके लुटले की, तो कफल्लक झाला. या प्रेयसीने केवळ स्वत:साठीच नव्हे तर, आपल्या कुटुंबीयांसाठी देखील प्रियकराकडून वस्तू खरेदी करून घेतल्या. तिने हिऱ्याची अंगठी, आयफोन, महागडे घड्याळ, हॅण्डबॅग, सँडल यांची जोरदार ऑनलाइन शॉपिंग केली. गेले तीन वर्षे हे सुरू होते आणि या काळात त्याने जवळपास 80 लाख उधळले. पण जेव्हा मुंडावळ्या बांधायची वेळ आली तेव्हा, आपल्या आधीच्या प्रियकरासोबत तिने साखरपुडा केला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने थेट पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे ती सध्या फरार झाली आहे. (Cheating in Love: youth complains to the police about financial cheating)

वास्तविक, रेवा शहरातील आझाद नगरमध्ये राहणारा विवेक शुक्ला हा तरुण आस्था उर्मालियाच्या प्रेमात पडला होता. विवेकने आपल्या या प्रेयसीने ‘दिल खोल के’ खर्च करायला सुरुवात केली. महागड्या हॉटेल्समध्ये जेवण आणि ऑनलाइन शॉपिंगसोबतच लाखो रुपयांच्या भेटवस्तू देण्याचा सिलसिला सुरू झाला. आस्थाने स्वतःसाठी तसेच आपल्या बहिणींसाठी भरपूर खरेदी केली. आस्था ऑनलाइन शॉपिंग करायची आणि त्याची बिले विवेक भरायचा.

हेही वाचा – Shiv Sena UBT MP : आमची वज्रमुठ आहे, टायगर जिंदा है; ठाकरेंच्या खासदारांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

साधारणपणे साडेतीन वर्षांपूर्वी आस्थाबरोबर भेट झाली होती. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. आस्थाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन जवळपास साडेतीन वर्षांत माझ्या पैशांतून 45 लाख रुपयांची खरेदी केली. याशिवाय, आस्थाला हिऱ्याची अंगठी, आयफोन, हँडबॅग, चष्मे, महागडे घड्याळ, कपडे आणि लाखो रुपये भेट म्हणून दिले. कुटुंबाने लग्नाचे आश्वासन दिले होते, पण आता त्यांनी फसवणूक करून तिने आधीच्या प्रियकरासोबत साखरपुडा केला, असे विवेकने पोलिसांना सांगितले. आस्था उर्मालिया हिचा एका राजकीय कुटुंबाशी संबंध आहे. माजी आमदार राजकुमार उर्मालिया यांची पुतणी आहे. तर तिचे वडील माजी जिल्हाध्यक्ष आहेत, असा दावाही त्याने केला.

विवेक जेव्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला, तेव्हा, या प्रकरणी कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा याबद्दल पोलीस संभ्रमात होते. पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली. त्यात आस्थाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन विवेकची फसवणूक केल्याचे आढळले. ऑनलाइन आणि महागड्या भेटवस्तूंवर प्रियकराने सुमारे 80 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर शेवटी, पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेतला आणि कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पोलीस अधीक्षक रितू उपाध्याय यांनी सांगितले. (Cheating in Love: youth complains to the police about financial cheating)

हेही वाचा – Fadnavis On Gandhi : ही तर आणखी एका फेक नरेटिव्हची तयारी, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस –