घरदेश-विदेशबजरंग दलची अजब मागणी; गरब्यासाठी 'आधार'ची सक्ती!

बजरंग दलची अजब मागणी; गरब्यासाठी ‘आधार’ची सक्ती!

Subscribe

गरब्याच्या कार्यक्रमात सामील होणाऱ्या बिगर हिंदू लोकांना ओळखण्यासाठी तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या हुल्लडबाजीला लगाम लावण्यासाठी बजरंग दलाने ही मागणी केल्याचे वृत्त समोर येत आहे.

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने देशभर गरबा, दांडीया कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण बजरंग दलाने यंदा दांडीया कार्यक्रमाच्या आयोजकांकडे अजब मागणी केली आहे. दांडीया-गरबा कार्यक्रमात प्रवेश करण्यापूर्वी आधारकार्ड तपासण्याची मागणी बजरंग दलाने गरबा आयोजकांकडे केली आहे. गरब्याच्या कार्यक्रमात सामील होणाऱ्या बिगर हिंदू लोकांना ओळखण्यासाठी तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या हुल्लडबाजीला लगाम लावण्यासाठी बजरंग दलाने ही मागणी केल्याचे वृत्त समोर येत आहे.

याबाबत बोलताना बजरंग दलाचा प्रवक्ता एस. कैलाश म्हणाले की, “गरबा आयोजकांकडे आम्ही गरब्याच्या प्रवेशासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याची मागणी केली आहे. बिगर हिंदू लोकांना गरब्यातील प्रवेश नाकारण्याबाबत आणि त्यांना गरब्यासारख्या कार्यक्रमांमध्ये बाउन्सर्स म्हणून नियुक्त न करण्याबाबतची मागणी केली आहे.” ते पुढे म्हणाले की, “मागील काही वर्षांपासून असे लक्षात आले आहे की काही बिगर हिंदूंच्या समुहाकडून नवरात्री सणाच्या पावित्र्याबाबत काहीच देणे-घेणे नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर गरब्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन या समुहाने महिलांचा अपमान केल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे गरबा आयोजकांकडून नियुक्त करण्यात आलेले बिगर हिंदू बाउन्सर्स हे या हुल्लडबाजांच्या गरब्यातील प्रवेशाला कारणीभूत ठरत आहेत.

- Advertisement -

गरबा स्थळांवर लक्ष ठेवणार

एस. कैलाश म्हणाले की, “यंदा गरबा स्थळांवर बजरंग दलाचे कार्यकर्ते स्वतः हजर राहणार आहेत. यावेळी गरब्याच्या ठिकाणी बिगर हिंदूंना प्रवेश नाकारण्यासाठी बजरंग दल लक्ष ठेवेल. बिगर हिंदूंकडून गरब्यात होणारी हुल्लडबाजी रोखण्याचे काम बजरंग दल करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -