घरताज्या घडामोडीकोरोनाची लस घेण्यासाठी लागणार 'ही' कागदपत्रे

कोरोनाची लस घेण्यासाठी लागणार ‘ही’ कागदपत्रे

Subscribe

नववर्षाच्या सुरुवातीलाच दोन कोरोना लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या दोन लसींना मान्यता दिली आहे. पण सध्या कोरोना लसीकरण केव्हापासून सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यांत २८ आणि २९ तारखेला देशातील चार राज्यांमध्ये काही ठिकाणी लसीकरणाची ड्राय रन पार पडली. त्यानंतर देशातल्या सर्व राज्यांमधील काही जिल्ह्यात पहिल्यांदा २ जानेवारी लसीकरणाची ड्राय रन झाली. आता दुसऱ्यांदा लसीकरणाची ड्राय रन ८ जानेवारी म्हणजेच उद्या होणार आहे.

कोरोना लसीकरणाची ड्राय रन झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे. पण कोरोना लस घ्यायची असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे खूप महत्त्वाचे आहे. कोरोना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशनकरता १२ कागदपत्रांपैकी एक पुरावा असणे, खूप महत्त्वाचे आहे. ही १२ कागदपत्रे आहे कोणती? ते पाहा…

- Advertisement -
  • पासपोर्ट
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायन्सस
  • पेन्शन डॉक्युमेंट, ज्यामध्ये फोटो असतील
  • बँकेचे पासबुक
  • केंद्र किंवा राज्य सरकारी कंपन्यांकडून देण्यात फोटोसहित असलेले ओळखपत्र
  • खासदार किंवा आमदार यांना फोटोसहित दिलेले अधिकृत ओळखपत्र
  • NPR अंतर्गत ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ यांच्याकडून देण्यात आलेले स्मार्ट कार्ड
  • कामगार मंत्रालयाकडून मिळालेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

वरील १२ कागदपत्रांपैकी एखादा पुरावा लस घेण्यासाठी असणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -