घरदेश-विदेशनामिबियातून जयपूरला नव्हे तर ग्वाल्हेरला आणले जाणार चित्ते, अखेरच्या क्षणी निर्णयात बदल

नामिबियातून जयपूरला नव्हे तर ग्वाल्हेरला आणले जाणार चित्ते, अखेरच्या क्षणी निर्णयात बदल

Subscribe

70 वर्षांनंतर चित्ते भारतात येणार आहेत. 17 सप्टेंबरला नामिबियातून 8 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. नामिबियातील या चित्त्यांना विशेष चार्टर विमानाने ग्वाल्हेरला आणण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना जयपूरला आणले जाणार होते. पण लॉजिस्टिकच्या समस्येमुळे प्लान बदलण्यात आला आहे. या चित्त्यांना ग्वाल्हेरहून हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात (केएनपी) आणले जाईल. अशा स्थितीत जयपूरला चित्ता दर्शनासाठी येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी विमानतळाजवळ बुक केलेल्या खोल्यांचे बुकिंग रद्द करण्यात आले.

नामिबियातून चित्ते आणणारे मालवाहू विमान शुक्रवारी रात्री निघणार आहे. ते 17 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता ग्वाल्हेरला पोहोचेल. येथून या चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो पार्क येथे आणण्यात येणार आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी पंतप्रधान या चित्त्यांना उद्यानात बांधलेल्या खास जागेवर सोडतील.

- Advertisement -

प्रवासादरम्यान चित्त्यांना अन्न दिले जाणार नाही –

विशेष बाब म्हणजे नामिबिया ते भारत प्रवासादरम्यान या चित्त्यांना हवेत असताना रिकाम्या पोटी आणले जाईल. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, नामिबियातून उड्डाण केल्यानंतर चित्त्यांना थेट कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात अन्न दिले जाईल. खबरदारी म्हणून, प्रवासाच्या वेळी जनावराचे पोट रिकामे असणे अनिवार्य आहे. लांबच्या प्रवासात जनावरांना मळमळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून असे पाऊल उचलले जाते.

- Advertisement -

चित्ता ३० दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील –

चौहान यांच्या म्हणण्यानुसार, कुनोला पोहोचल्यानंतर चित्त्यांना 30 दिवस त्यांना एका बदिस्त जागेत ठेवण्यात येईल. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान 25-30 चित्ते येथे असले पाहिजेत, त्यामुळे पाच वर्षांत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणखी चित्ते येथे आणले जातील.

1947 पासून भारतात एकही चित्ता नाही –

चित्यांची शिकार झपाट्याने वाढल्याने ही प्रजाती धोक्यात आली होती. मध्य प्रदेशात कोरियाचे महाराज रामानुज प्रताप सिंग देव यांनी 1947 मध्ये देशातील शेवटच्या तीन चित्यांची हत्या केली होती. यानंतर, 1952 मध्ये, भारत सरकारने अधिकृतपणे देशातील चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -