घरदेश-विदेशचेन्नईमध्ये अल्पवयीन मुलीवर २२ जणांनी केला बलात्कार

चेन्नईमध्ये अल्पवयीन मुलीवर २२ जणांनी केला बलात्कार

Subscribe

चेन्नईमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर २२ नराधमांनी सात महिने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. गुंगीचे औषध देऊन हे नराधम पीडित मुलीवर बलात्कार करत होते. २२ आरोपींपैकी १८ जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

देशभरामध्ये महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाही. या घटनांना रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात असताना चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चेन्नईमध्ये सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर २२ जणांनी सात महिने बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. चेन्नईच्या अयानवरम भागामध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपिंविरोधात गुन्हा दाखल करत १८ जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्यांनीच केला बलात्कार

अयानवरम भागामध्ये रहाणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीवर २२ जणांनी ७ महिने बलात्कार केला आहे. पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्यांबद्दल ऐकले तर सगळ्यांना धक्का बसेल. ती ज्या बिल्डिंगमध्ये राहते त्या ठिकाणी काम करणाऱ्या नराधमांनीच तिला शिकार बनवले. बिल्डिंगचा सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेला सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर आणि पाणी सप्लाय करणाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

जीवे मारण्याची दिली होती धमकी

आरोपी पीडित मुलाला गुंगीचे औषध द्यायचे, गुंगीचे इंजेक्शन द्यायचे, कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिक्स करुन द्यायचे, तर कधी गुंगीची पावडर तिच्या नाकाला लावायचे त्यानंतर तिच्यावर बलात्कार करायचे असे पीडित मुलीने कुटुंबियांना आणि पोलिसांना सांगितले. आरोपी या मुलीवर फक्त बलात्कार नाही करायचे तर अश्लील व्हिडिओ देखील बनवायचे. त्यांनी तिला जीवे मारण्याची आणि अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने यासंदर्भात कोणालाच काही सांगितले नाही.

- Advertisement -

१८ आरोपींना पोलिसांनी केली अटक

पीडित मुलीवर सात महिने ती राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच बलात्कार होत होता. पण कोणालाच याबद्दल कळाले नाही. आरोपी पीडित मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करायचे. जेव्हा तिला हे सर्व सहन करण्यापलिकडे झाले तेव्हा तिने घडलेल्या प्रकाराबाबत बहिणीला सांगितले तेव्हा हे प्रकरण उजेडात आले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपिंवरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, बिल्डिंगमधील ६६ वर्षाच्या लिफ्ट ऑपरेटर रवि कुमारने सर्वात आधी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -