घरदेश-विदेशविमानात बॉम्ब असल्याचे समजताच लखनऊ-चेन्नई इंडिगोचं उड्डाण रोखलं

विमानात बॉम्ब असल्याचे समजताच लखनऊ-चेन्नई इंडिगोचं उड्डाण रोखलं

Subscribe

विमानात बॉम्ब असल्याचे सांगितल्यावर सीआयएसएफ टीमने प्रवाशाला घेतले ताब्यात

एका प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याचे सांगितल्यावर लखनऊमधील चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर लखनऊ-चेन्नईचे इंडिगो विमानाचे उड्डाण रोखण्यात आले होते. यावेळी लखनऊतील या विमानतळावरील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले त्यानुसार तपास सुरू करून कारवाईच्या दिशेने पाऊलं उचलण्यात आली. विमानात बॉम्ब असल्याचे ज्या विमान प्रवाशाने सांगितले त्याला दिल्लीकडे जायचे होते. विमानात बॉम्ब असल्याचे सांगितल्यावर सीआयएसएफ टीमने त्याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

लखनऊच्या विमानतळावर शनिवारी संध्याकाळच्या वेळेस एकच खळबळ उडाली. ज्यावेळी एका प्रवाशाने लखनऊ-चेन्नई उड्डाणात बॉम्ब असल्याचे सांगितले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणार्‍या पीयूष वर्मा अशा प्रवाशास सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे.

पियुष वर्मा असे नाव असलेला प्रवासी लखनऊ विमानतळाच्या गेट नंबर ५ वर विचित्र हरकती करत होता, ते पाहून सीआयएसएफ टीम घाबरली आणि सीआयएसएफच्या जवानांनी त्याची चौकशी करण्याकरिता ताब्यात घेतले. त्याच्या चौकशी दरम्यान पीयूष यांनी सीआयएसएफ टीमला सांगितले की लखनऊहून चेन्नईकडे जाणार्‍या इंडिगो विमानात बॉम्ब आहे, हे ऐकताच सुरक्षा कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आणि त्यांना घाम फुटला. यानंतर सीआयएसएफने तातडीने सर्वांना सतर्क केले.

- Advertisement -

ज्या विमानात पियुष वर्मा यांनी बॉम्ब असल्याचा दावा केला होता, ते विमान शनिवारी रात्री ७.२५ वाजता लखनऊहून चेन्नईकडे रवाना होणार होते. मात्र, प्रवासी पीयूष वर्मा यांच्या दाव्यानंतर हे विमान थांबविण्यात आले. यानंतर शोध घेण्यात आला आणि त्यानंतर विमानास सुटण्याची परवानगी देण्यात आली. त्याचवेळी प्रवासी पीयूष वर्मा हे दिल्लीहून दिल्लीकडे जात होते. विमान क्रमांक 6E447 हे रात्री १०.४० वाजता ते दिल्लीहून निघाले होते. मात्र, सुरक्षा तपासणीनंतर तो प्रवासी विमानतळाच्या आत गेला आणि त्याने विचित्र हरकती करायला सुरुवात केली होती.


चित्रपट’83’ शुटिंगदरम्यान रणवीर सिंगला झाले अश्रु अनावर
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -