घरदेश-विदेशडान्स शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग, मल्ल्याळी डान्स टीचरला अटक

डान्स शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग, मल्ल्याळी डान्स टीचरला अटक

Subscribe

या डान्स टीचरवर जवळपास ९० विद्यार्थीनींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपी डान्स टीचर हा पिडीत विद्यार्थीनींना अश्लिल कमेंट्स आणि शिवीगाळ करत होता.

माजी विद्यार्थीनीच्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेन्नईमधील एका डान्स अकादमीच्या मल्याळी डान्स टीचरला अटक करण्यात आली आहे. या डान्स टीचरवर जवळपास ९० विद्यार्थीनींवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपी डान्स टीचर हा पिडीत विद्यार्थीनींना अश्लिल कमेंट्स आणि शिवीगाळ करत होता. तसंच ज्या विद्यार्थीनींनी त्याला विरोध केला त्यांना तो डान्समधील महत्त्वाच्या भूमिकेतून काढून टाकत होता. या प्रकारात आणखी तीन रेपर्टरी कलाकारांची नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.

चेन्नईमधील कलाक्षेत्र फाऊंडेशनच्या रुक्मिणीदेवी कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या अकादमीचे डान्स टीचर हरिपद्मन याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी मल्याळी माजी विद्यार्थीनीच्या तक्रारीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयपीसी कलम 354A आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हा आरोपी डान्स टीचर याठिकाणी डान्स शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना डान्स शिकवण्याच्या नावाखाली लैंगिक चाळे करायचा.

- Advertisement -

हे ही वाचा : राहुल गांधींसाठी काय पण! ‘या’ महिलेने इमारतच त्यांच्या नावावर केली

या महाविद्यालयात एकूण चार शिक्षक या विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती समोर येत आहे. या चार शिक्षकांपैकी एक हा डान्स टीचर आहे. या शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अकादमीमधील विद्यार्थीनींनी आंदोलन केलं. जवळपास ९० विद्यार्थिनींनी या शिक्षकांवर लैंगिक अत्याचार, बॉडी शेमिंग आणि गैरवर्तनाचे आरोप करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं सांगितलं.

- Advertisement -

हे ही वाचा: यूपी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मुघलांचा विषय बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

एका विद्यार्थ्याने सांगितले की, “ज्यांनी त्याला सहकार्य केलं नाही त्यांना तो शिवीगाळ करत होता…” तसंच त्याने आम्हाला अश्लिल टेक्स्ट मेसेज पाठवले. तो मुलींना कमी गुण द्यायचा आणि जे त्याला सहकार्य करत नव्हते त्यांना तो डान्समध्ये संधी देत नव्हता”, असं देखील काही विद्यार्थ्यानी सांगितलं. सध्या या डान्स टीचरला चेन्नई पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -