घरElection 2023Chhattisgarh Assembly 2023 : छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार?

Chhattisgarh Assembly 2023 : छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार?

Subscribe

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल 30 नोव्हेंबरला समोर आले होते. या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविला आहे.

रायपूर : देशात मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड पाच राज्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकाल येणार आहेत. या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निकालावर 2024च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जाते. यामुळे आज पाच राज्यांमध्ये काँग्रेस की कमळ नक्की कोणाच्या हाती सत्ता येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहेत. या छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांचा आज निकाल येणार आहे.

छत्तीसगड पहिल्या टप्प्यात 7 आणि दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर असे दोन टप्प्यात विधानसभेच्या 90 जागांवर मतदान झाले आहे. 2018च्या मध्ये छत्तीसगडमध्ये तब्बल 15 वर्षानंतर काँग्रेसची सरकार आली होती. यानंतर काँग्रेसने भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष छत्तीसगडचा कार्यभार सांभाळला होता. यापूर्वी रमण सिंह हे छत्तीसगडचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहले होते. छत्तीसगडमध्ये भाजप विरूद्ध काँग्रेस यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळते. छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपाकडून रमण सिंह आणि काँग्रेसकडून भूपेश बघेल हे दोघेही दिग्गज नेते आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Chhattisgarh Election 2023 : महिलांनी महिलांसाठी हाती घेतली मतमोजणीची धुरा

महिलांकडे मतमोजणीची जबाबदारी

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याकडे विशेष लक्ष लागले आहे. या जिल्ह्यात बहुसंख्य महिला मतदार असल्याने जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी अभिनव निर्णय घेतला आहे. येथे प्रथमच मतमोजणीची जबाबदारी महिलांकडे सोपवली असून, ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी 196 महिला कर्मचारी कार्यरत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – छत्तीसगडमधील महिलांना प्रतिवर्ष…; दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसकडून आर्थिक मदतीचे आश्‍वासन

एक्झिट पोल काय म्हटले?

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल 30 नोव्हेंबरला समोर आले होते. या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविला आहे. छत्तीसगडच्या चाणक्या, सी व्होटर आणि इतर एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा पराभव होण्याचा शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागांचा आज निकाल येणार आहे. यात छत्तसीगडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 46 जागांची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -