घरElection 2023Chhattisgarh Election 2023 : महिलांनी महिलांसाठी हाती घेतली मतमोजणीची धुरा

Chhattisgarh Election 2023 : महिलांनी महिलांसाठी हाती घेतली मतमोजणीची धुरा

Subscribe

रायपूर : छत्तीसगडसह चार राज्यांमधील निवडणुकीच्या मतमोजणीला आज, रविवारी सुरुवात झाली आहे. तथापि, या सर्वात छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याकडे विशेष लक्ष लागले आहे. या जिल्ह्यात बहुसंख्य महिला मतदार असल्याने जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी अभिनव निर्णय घेतला आहे. येथे प्रथमच मतमोजणीची जबाबदारी महिलांकडे सोपवली असून, ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी 196 महिला कर्मचारी कार्यरत आहेत.

हेही वाचा – Sanjay Raut : हैदराबाद हे विजयाचे प्रतीक…, संजय राऊत यांचा भाजपावर रोखठोक प्रहार

- Advertisement -

मतमोजणीची जबाबदारी पार पाडताना कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून या सर्व महिलांना चार टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले. नाथियांवागाव येथील शासकीय पॉलिटेक्निक कॅम्पसमध्ये शनिवारी सर्व 196 महिलांना चौथ्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याआधी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील प्रशिक्षण देण्यात आले होते. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रियंका शुक्ला यांच्या उपस्थितीत नाथियांवागाव येथील शासकीय पॉलिटेक्निकच्या मतमोजणी कक्षात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शुक्ला यांनी मतमोजणी कर्मचार्‍यांना केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर, मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेची सोप्या शब्दांत माहिती देऊन त्यांना दिलेली जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रेरित केले.

- Advertisement -

विशेष म्हणजे, अनेक सरकारी कर्मचारी निवडणुकीसारखी महत्त्वाची आणि अनिवार्य जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी या महिलांनी ही जबाबादीर स्वीकारली आहे. एवढेच नव्हे, मतमोजणीसाठी ड्युटी लावण्यासाठी या महिलांमध्ये स्पर्धाही पाहायला मिळाली. मतमोजणीसाठी संगणकाद्वारे रॅण्डम ड्युटी लावण्यात आली होती. ज्यांची नावे त्यात नव्हती, त्या महिला निराश झाल्या आणि त्यांनी थेट उच्च अधिकाऱ्यांना फोन करून आपली ड्युटी का लावली नाही, असे त्यांनी विचारले. प्रशिक्षण शिबिरात त्या नियमितपणे उपस्थितही होत्या. निवडणूक ड्युटीसाठी महिलांनी दाखवलेला एवढा उत्साह पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा – MP Election Results : मध्य प्रदेशात ‘कमळ’ की कमलनाथ? निकालातून होणार चित्र स्पष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -