Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी chhattisgarh-नक्षलवादी हल्ला, रॉकेट लॉंचरने जवानांवर हल्ला, सर्च ऑपरेशनवर प्रश्नचिन्ह

chhattisgarh-नक्षलवादी हल्ला, रॉकेट लॉंचरने जवानांवर हल्ला, सर्च ऑपरेशनवर प्रश्नचिन्ह

रविवारी २० जवानांचे मृतदेह जंगलात सापडल्याने ज्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशनची योजना आखली होती व ज्यांनी त्याला परवानगी दिली त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले आहे.

Related Story

- Advertisement -

छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित असलेल्या विजापूर जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या चकमकीत २३ जवान शहीद झाले असून २५ जवान गंभीर जखमी झाले आहेत. तर १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.नक्षलवाद्यांनी जवानांना घेरून रॉकेट लॉंचरने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. रविवारी २० जवानांचे मृतदेह जंगलात सापडल्याने ज्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशनची योजना आखली होती व ज्यांनी त्याला परवानगी दिली त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले आहे.

- Advertisement -

जोनागुडा या डोंगराळ भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना २० दिवसांआधीच मिळाली होती. पण डोंगराळ भाग असल्याने नक्षलवाद्यांशी थेट सामना करणे अडचणीचे ठरणार असल्याने सीआरपीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जगदलपूर, रायपूर, आणि बीजापूर या भागात स्वत: जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर या सर्च मोहिमेची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर दोन एप्रिलला सुकमा आणि बीजापूर येथे दोन हजाराहून अधिक जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. नक्षलवादी तारेम गावात असल्याची व नक्षलवाद्यांच्या बटालियन १ चा कमांडर हिडमा आपल्या साथीदारासह तेथे आल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानंतर जंगलात वसलेल्या या गावालाच जवानांनी घेरले होते. पोलिसांच्या मदतीने हे सर्च ऑपरेशन सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी जवानांना घेरले व रॉकेट लॉंचरने त्यांच्यावर ह्लला केला.

 

- Advertisement -