Homeताज्या घडामोडीChhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; 9 जवान शहीद, 6 गंभीर...

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; 9 जवान शहीद, 6 गंभीर जखमी

Subscribe

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सात जवान शहीद झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले असून सहा जण गंभीर जखमी असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यात शहीदांचा आकडा वाढण्याची भीत व्यक्त केली जात आहे.

छत्तीसगड : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सात जवान शहीद झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले असून सहा जण गंभीर जखमी असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यात शहीदांचा आकडा वाढण्याची भीत व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,छत्तीसगडमधील अबुझमदमध्ये जवानांनी रविवारी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर सर्व जवान अबुझमद येथून निश्चित स्थळी पोहचत होते. त्यावेळी बिजापूरमधील कुटरू परिसरात नक्षलवाद्यांनी जवान जात असलेल्या गाडीत IED स्फोट घडवून आणला. या गाडीत एकून 15 जवान होते, त्यातील नऊ जवान शहीद झाले असून सहा जवान गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुटुरु – बेंद्रे रोडवर हा ब्लास्ट केला आहे. जेव्हा दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरची संयुक्त ऑपरेशन पार्टी ऑपरेशन करुन परतत होती. त्यावेळी दुपारी २.१५ वाजताह कुटरु ठाणे क्षेत्रातील अंबेली गावाजवळ नक्षलवाद्यांनी घात लावून हा ब्लास्ट घडवला. या ब्लास्टमध्ये लष्कराचे वाहन टार्गेट होऊन मोठी जिवीतहानी झाली आहे


हेही वाचा – Tamil Nadu Governor’s Walkout : तामिळनाडू विधानसभेत राज्यपाल रवींचा पुन्हा सभात्याग, कारण काय?

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -