घरदेश-विदेशChhattisgarh Naxal Attack: २८ हून अधिक नक्षलवादी ठार; १ जवान बेपत्ता- DG...

Chhattisgarh Naxal Attack: २८ हून अधिक नक्षलवादी ठार; १ जवान बेपत्ता- DG (CRPF)

Subscribe

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यासंदर्भात सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी मोठा दावा केला आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्यात २८ हून अधिक नक्षलवादी ठार झाले असल्याचे कुलदीप सिंग म्हणाले. शनिवारी झालेल्या या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यात ११ जवान शहीद झाले आहेत तर अद्याप एक जवान बेपत्ता असल्याचेही त्यांनी सांगितले. ”तुमच्याकडे या हल्ल्यासंदर्भात माहिती आली असेल की नक्षलवाद्यांच्या २८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे सत्य आहे की, ठार झालेल्या लोकांची संख्या स्वीकारत नाही. परंतू ही संख्या २८ हून अधिक असेल आणि जखमींची संख्या त्यापेक्षा अधिक असेल”, असेही कुलदीप सिंग यांनी सांगितले.

- Advertisement -

ज्यावेळी जवान त्यांची शोधमोहीम संपवून परत येत होते त्यावेळी टेकलागुडामजवळ अचानक हा हल्ला करण्यात आला आणि त्यांच्यावर गोळीबार देखील करण्यात आला. आमच्या सैन्यानी रणनितीनुसार लढाई सुरू केली होती. या लढाईत कित्येक जण गंभीररित्या जखमी झाले, असे कुलदीप सिंग यांनी सांगितले.

याप्रकरणासंदर्भात अधिक माहिती देताना कुलदीप सिंग य़ांनी असेही सांगितले की, शहीद झालेल्या जवानांमध्ये बिजापूरचे ८ डीआरजी जवान, छत्तीसगडचे ६ एसटीएफ जवान, ७ कोबरा जवान आणि १ बस्तरिया बटालियन यांचा सहभाग आहे. यासह एक जवान अद्याप बेपत्ता असल्याचे देखील कुलदीप सिंग यांनी सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -