Chhava Movie Impact In delhi दिल्ली : दिल्लीत ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर काही संतप्त लोकांनी दिल्लीत गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे. बाबर रोडच्या साइनबोर्डलाही काळे फासले आहे. शनिवारी (22 फेब्रुवारी) ही घटना घडली. तसेच, दिल्लीताल अकबर, बाबर आणि हुमायून रोडचे नाव बदलण्याची मागणी या संतप्त लोकांकडून करण्यात आली आहे. शिवाय, अकबर, बाबर आणि हुमायून यांची नावं काढण्यात यावी. कारण अकबर, बाबर आणि हुमायून हे कलंक आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूप अन्याय केला होता, असंही संतप्त लोकांनी म्हटलं. (Chhava Movie Impact In delhi youth blackened the board of akbar babar road news In Marathi)
दिल्लीत 14 सप्टेंबर 2019 रोजी हिंदू सेनेने बाबर रोडच्या साइनबोर्डला काळा रंग दिला होता. तसेच, त्या बोर्डचं नाव भारतीय व्यक्तीच्या नावावर ठेवण्याची मागणी केली होती. तसेच, ‘सरकारने अकबर-बाबर रोडचे नाव बदलावे. या रस्त्याला परदेशी आक्रमकांचे नाव देण्यात आले आहे’, असे हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी त्यावेळी म्हटले होते.
‘छावा’ चित्रपटची 7 दिवसांत 200 कोटींची कमाई
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच 200 कोटींचा टप्पा ओलांडला. ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.
याशिवाय, चित्रपटाच्या दमदार कथेनेही प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमध्ये 5 लाख तिकिटे आधीच विकली गेली आहेत. या चित्रपटाचे एकूण बजेट 130 कोटी रुपये आहे. बॉलिवूडने 2025 वर्षाची सुरुवात ‘छावा’ या चित्रपटानं धमाल केली आहे.
हेही वाचा – Shiv Sena UBT : सरकार नावाचा बदमाष भावाची लाडक्या बहिणींवर भाईगिरी; ‘सामना’तून ठाकरेंची टीका