पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली; ३० लाखांच्या कोंबड्या चोरल्या

गेल्या काही दिवसांपासून पाकची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तेथील जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकार व प्रशासन नियोजन करत आहे. वीजेची मागणी व थकबाकी याचा मेळ घालण्यासाठी पाक सरकारने रात्री ८ नंतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विवाह समारंभासाठी रात्री १० पर्यंतची परवानगी देण्यात आली आहे.

chicken

रावळपिंडीः पाकिस्तान सैन्याच्या मुख्यालयाजवळून पाच हजार कोंबड्या चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या पाच हजार कोंबड्यांची किमत ३० लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची आर्थिकस्थिती ढासळली जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याने ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तेथील जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकार व प्रशासन नियोजन करत आहे. वीजेची मागणी व थकबाकी याचा मेळ घालण्यासाठी पाक सरकारने रात्री ८ नंतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विवाह समारंभासाठी रात्री १० पर्यंतची परवानगी देण्यात आली आहे.

त्यातच आता लुटीच्या घटना घडत आहेत. पाक सैन्य दलाच्या मुख्यालयाजवळ लुट झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दहा ते बाराजणांनी ही लुट केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. येथील पोल्ट्री फार्मचे मालक वकास अहमद यांनी याची पोलिसांत तक्रार दिली आहे. गुरुवारी दहा ते बाराजणांनी पोल्ट्री फार्मवर हल्ला केला. त्यांच्याकडे शस्त्रे होती. हल्लेखोरांनी पोल्ट्री फार्ममधील तिघाजणांना बंदी केले. लुटारूंजवळ तीन छोटे ट्रक व दोन बाईक होत्या. लुटलेल्या कोबंड्या ट्रकमध्ये टाकून हल्लेखोर तेथून पळून गेले.

पाकचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांची मुलगी व विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भाची मरियम नवाज यांनी पाकच्या आर्थिक संकटावर भाष्य केले आहे. पाकच्या विद्यमान पंतप्रधानांना पाकच्या आर्थिक परिस्थितीबाबत सर्व ज्ञात आहे. पाकिस्तान मुस्लिम लिग नवाज पक्ष देशाला आर्थिक संकटातून नक्कीच बाहेर काढेल, असे मरियम नवाज यांनी सांगितले.

पाकिस्तान आर्थिक गर्तेत सापडला असून तेथील सरकार आता ‘अल्लाह’च्या भरवशावर आहे, असे दिसते. इस्लामच्या नावाने स्थापन झालेला पाकिस्तान हा एकमेव देश आहे. त्यामुळे त्याच्या विकास आणि समृद्धीची जबाबदारी ‘अल्लाह’ची आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी शुक्रवारी केले