five state elections: वाढत्या कोरोनामुळे ५ राज्यांतील निवडणुकांबाबत संभ्रम, मुख्य निवडणूक आयुक्तांकडून चर्चांना पूर्णविराम

chief election commissioner sushil chandra said take five state elections as per schedule

देशातील पाच राज्यांतील निवडणुकांवर कोरोनाचा सावट असल्यामुळे या निवडणुका नियोजित वेळेत होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय आरोग्य सचिव यांच्यामध्ये बैठक झाली होती. तसेच ज्या राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी कोरोनाचा आढावा घेतला आहे. देशात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी ज्या राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. तिथे नियोजित वेळेनुसार निवडणूक घेण्यात यावी असे सांगितले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणूक घेण्यात येणार आहेत. त्या राज्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहे. या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे निवडणूक पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यात यावी असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निवडणुका होणार की नाही? अशा चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकांबाबत माहिती दिली आहे. यावेळी निवडणूक आयुक्तांनी आगामी ५ राज्यांतील निवडणुका पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यास सांगितले आहे. तसेच निवडणुकांच्या प्रचार आणि सभांमध्ये कोरोनाचे उल्लंघन झाले असल्याचे दिसलं आहे. परंतु निवडणुकांची घोषणा झाल्यावर कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच जेव्हा निवडणुकांची घोषणा करण्यात येईल त्यावेळी कोरोना संदर्भातील नियमावली जारी करण्यात येईल असे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे मतदानाचा कालावधी वाढवला

कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांतील निवडणुकांसाठी मतदानाचा वेळ वाढवण्यात आला आहे. गर्दी होऊ नये यासाठी हा वेळ वाढवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदानाच्या दिवळी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात करण्यात येणार असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : वर्ष २०२१ मध्ये पर्यावरणीय बदलांचा फटका भारतासह चीन, अमेरिकेलाही, कुठे किती नुकसान ?