सरन्यायाधीश झाले गाईड; मुलींसाठी केले असे काही

सरन्यायाधीश चंद्रचुड यांना दोन मुली आहेत. माही (१६) व प्रियंका (२०) अशी या दोघांची नावे आहेत. सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी चंद्रचुड यांचा कुटुंबासोबतचा फोटो एक इंग्रजी वर्तमानपत्राने दिला होता. त्या फोटोत सरन्यायाधीशांच्या दोन्ही मुली होत्या. न्यायालयाचे कामकाज कसे चालते हे बघायचे आहे, असा हट्ट या दोघींनी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्याकडे केला होता. मुलींचा हा हट्ट सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी शुक्रवारी पूर्ण केला.

Chief Justice D. Y. Chandrachud

नवी दिल्लीः संपूर्ण देशाचे नेहमीच लक्ष असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड शुक्रवारी गाईड झाले होते. आपल्या मुलींसाठी खास ते गाईड झाले होते. सरन्यायाधीशांमधील ‘बाबा’ बघून सर्वोच्च न्यायालयातील सर्व वकील, अधिकारी व पक्षकार थक्क झाले.

सरन्यायाधीश चंद्रचुड यांना दोन मुली आहेत. माही (१६) व प्रियंका (२०) अशी या दोघांची नावे आहेत. त्या दिव्यांग आहेत. सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी चंद्रचुड यांचा कुटुंबासोबतचा फोटो इंग्रजी वर्तमानपत्राने दिला होता. त्या फोटोत सरन्यायाधीशांच्या दोन्ही मुली होत्या. न्यायालयाचे कामकाज कसे चालते हे बघायचे आहे, असा हट्ट या दोघींनी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्याकडे केला होता. मुलींचा हा हट्ट सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी शुक्रवारी पूर्ण केला.

सरन्यायाधीश चंद्रचुड दोन्ही मुलींना व्हिलचेअरवर घेऊन शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. त्यामुळे सर्वच अवाक झाले. काहीजणांना कळेचना की नेमके काय सुरु आहे. सरन्यायाधीश चंद्रचुड मात्र कौतुकाने मुलींंना सर्व दाखवत होते. न्यायाधीश कुठे बसतात. वकील कुठे उभे राहून युक्तिवाद करतात याची माहिती माही व प्रियंकाला देण्यात आली. या दोघीही सर्व माहिती कुतूहलाने ऐकत होत्या. न्यायालयाची मांडणी बघत होत्या. त्यानंतर या दोघींना सरन्यायाधीशांच्या कॅबिनमध्ये नेण्यात आले. थंडी खूप असल्याने सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी मुलींना अधिककाळ न्यायालयात थांबू दिले नाही.

चंद्रचुड हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश आहेत. गेल्यावर्षी चंद्रचुड यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. सर्वाधिक काळ म्हणजे दोन वर्षे ते सरन्यायाधीश म्हणून काम करणार आहेत. ते महाराष्ट्रातील आहेत. विशेष म्हणजे माजी सरन्यायाधीश यु.यु. ललित यांच्याकडून चंद्रचुड यांनी पदभार स्विकारला. माजी सरन्यायाधीश ललित हेही महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रातील दोघा न्यायाधीशांची वर्णी लागली.

सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या खंडपीठाने नुकताच एक निकाल दिला. चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करणारा हा निकाल आहे. चित्रपटगृह ही खाजगी मालमत्ता आहे. त्यामुळे तेथे काय नियम करावेत याचा पूर्णपणे अधिकार चित्रपटगृह मालकांना आहेत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.