नवी दिल्ली: बलात्काराचा आरोप असलेल्या दिल्ली सरकारच्या उपसंचालकाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निलंबित केले आहे. तो डायरेक्टर महिला व बालकल्याण मंत्रालयात कार्यरत होता. मुख्यमंत्र्यांनी निलंबनाबाबत मुख्य सचिवांकडून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अहवाल मागवला आहे. उपसंचालक नरेश कुमार हा आपल्याच मित्राच्या अल्पवयीन मुलीवर मागच्या ब-याच दिवसांपासून बलात्कार करत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या मित्राचा आधीच मृत्यू झाला आहे. (Chief Minister Arvind Kejriwal has suspended the deputy director of the Delhi government who is accused of rape)
पीडितेवर या अधिकाऱ्याने अनेकवेळा बलात्कार केला आहे. त्यामुळे ती गर्भवती राहिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी 20 जुलै रोजी बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीच्या वडिलांचा 1 ऑक्टोबर 2020 रोजी मृत्यू झाला होता. तेव्हापासून ही अल्पवयीन मुलगी ही आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांसोबत त्याच्या घरी राहत होती. आरोपी अधिकारी महिला व बालविकास विभागात उपसंचालक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान तिच्यावर अनेकदा बलात्कार झाल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. यादरम्यान मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपातासाठी औषध दिल्याचाही आरोप आहे. आम आदमी पार्टी सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘ही घटना भयंकर आहे. या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. आत्तापर्यंत कारवाई व्हायला हवी होती. कारवाई न झाल्याने खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच आदेश दिले आहेत.
यावर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक पदावर इतके दिवस बसलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. आम्ही दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. त्याला अद्याप अटक का केली नाही, अशी विचारणादेखील केली आहे. आम्ही दिल्ली सरकारला नोटीस देखील जारी करत आहोत कारण आम्हाला त्यांच्या विरोधात काय तक्रारी आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे हे जाणून घ्यायचे आहे.
(हेही वाचा: कोरोनात पतीच्या निधनानंतर महिलेचे शेजारच्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध; व्हिडीओ काढला अन्… )