आंध्र प्रदेश सरकारने १३ नवे जिल्हे बनवले, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींनी आश्वासन केले पूर्ण

Chief Minister Jagan Mohan Reddy inaugurates 13 new districts in Andhra Pradesh
आंध्र प्रदेश सरकारने १३ नवे जिल्हे बनवले, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींनी आश्वासन केले पूर्ण

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी यांनी आज राज्यातील १३ नव्या जिल्ह्याची स्थापना केली. ज्यामुळे राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या १३ वरून २६ झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी यांनी आज गुंटूर जिल्ह्याच्या ताडेपल्लीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील १३ नव्या जिल्ह्यांचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री रेड्डी यांनी पुजारींनी सांगितलेल्या शुभ मुहूर्तानुसार जिल्ह्यांचा शुभारंभ केला. हे सर्व नवे जिल्हे आजपासून अस्तित्वात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान सांगितले की, ‘अधिक जिल्ह्यांची स्थापना हे सर्व क्षेत्रातील विकासाकडील एक पाऊल आहे.’

माहितीनुसार मुख्यमंत्री रेड्डी यांनी २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना आश्वासन दिले होते की, ‘जर त्यांचा पक्ष सत्तेत आला, तर २५ लोकसभा क्षेत्रांपैकी प्रत्येकाला एक जिल्हा बनवले जाईल.’ हेच आश्वासन आज मुख्यमंत्री रेड्डी यांनी पूर्ण केले आणि राज्याला १३ नवे जिल्हे दिले.

रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या नव्या जिल्ह्यांसाठी औपचारिक अधिसूचनेसह, राज्य सरकारने सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांचे फेरबदल केले आहेत आणि नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची नियुक्ती केली. यादरम्यान आंध्र प्रदेश मंत्रीमंडळाची गुरुवारी सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. यादरम्यान सत्तेत आल्यानंतर प्रशासन सुधारण्यासाठी आणखी निर्णय होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War: Grammys स्टेजवर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी पाठिंब्यासाठी केली विनंती