घरताज्या घडामोडीपश्चिम बंगालची कोरोना परिस्थिती चिंताजनक, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

पश्चिम बंगालची कोरोना परिस्थिती चिंताजनक, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

मृतदेहावर कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लहान भाऊ असीम बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. असीम बॅनर्जी यांची कोरोनाशी संघर्ष अपयशी ठरला आहे. असीम यांना एक महिन्यापुर्वी कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता अखेर त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. बंगालमध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे अनेक रुग्णांची मोठ्या संख्येन नोंद होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाला महिन्याभरापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. बंगालच्या मेडिको सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. असीम यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार करण्यात आले परंतु उपचाराला साथ न दिल्यामुळे असीम बॅनर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावली असल्याचे मेडिको सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी सांगितले.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांच्या परिवारात दुःखाचे वातावरण पसरले आहे. मृतदेहावर कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर कोरोनाबाधितांचा आकड्याने उच्चांकी गाठली आहे. पश्चिम बंगालमध्ये दिवसाला २० हजार रुग्णांची नोंद होत आहे. तर दररोज १०० कोरोनाबाधितांचा मृत्यूची नोंद होत आहे. निवडणूकी दरम्यान नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये कडक लॉकडाऊन

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असल्यामुळे ३० मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये खासगी कार्यालयांसह सरकारी कार्यालये सुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना मुभा देण्या आली असून त्यांना लोकल, ट्रेन प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सध्या एकुण १० लाख ९४ हजार ८०२ नागरिकांना कोरोना झाल्याची नोंद झाली आहे तर १२ हजार ९९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -