जयपूर : देशात पाच राज्यांच्या विधानसभांची रणधुमाळी सुरू आहे. यात राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यस्थान विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. राजेंद्र गुढा हे शिवसेना (शिंदे गट)कडून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे राजेंद्र गुढा यांच्या प्रचारासाठी राजस्थानमध्ये जाणार आहेत. या निमित्ताने मुख्यमंत्री शिवसेना ( शिंदे गट) राज्याबाहेर विस्तार वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक असलेले व्यापारी हे राजस्थानमध्ये मतदानासाठी जातात. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री हे राजस्थानमध्ये जाणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील प्रचारासाठी गेले होते. आता राजस्थानमध्ये जाणार आहेत. राजेंद्र गुढ यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारने भ्रष्टाचार केले आहेत आणि या भ्रष्टाचाराची नोंद ही लाल डायरी आहे, असा त्यांनी राजस्थानच्या विधानसभेत सांगितले होता. यामुळे राजस्थानच्या विधानसभेत गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे राजेंद्र गुढ यांच्यामुळे लाल डायरी ही राजस्थानच्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा झाला आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातील सभेवर मनोज जरांगे पाटील म्हणाले; “समाजाचा…”
राजेंद्र गुढ यांचा अल्पपरिचय
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी मतदार संघाचे राजेंद्र गुढा हे आमदार आहेत. राजेंद्र यांचे आडनाव हे गुढा या त्यांच्या नावाने ठेवले आहे. 2018 मध्ये राजेंद्र गुढा यांना बहुजन समाज वादी पार्टीच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि विजय देखील झाले. आतापर्यंत राजेंद्र गुढा हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
हेही वाचा – होय, आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत अन् विकृत; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
नेमके काय आहे लाल डायरी?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा असल्याचा उल्लेख अमित शाहांनी केला होता, असा दावा राजेंद्र गुढ यांनी केली आहे. या लाल डायरीमुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या लाल डायरीवरून राजस्थानच्या विधानसभेत गोंधळ घातला होता. यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख केला होता. यानंतर राजस्थानच्या निवडणुकीत लाल डायरी हा हे मुद्दा झाला आहे.