घरताज्या घडामोडीवधू-वर, वऱ्हाडींना लग्नमंडपातून हाकलणे जिल्हाधिकाऱ्यांना भोवले, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित

वधू-वर, वऱ्हाडींना लग्नमंडपातून हाकलणे जिल्हाधिकाऱ्यांना भोवले, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित

Subscribe

जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांचे नेटकऱ्यांनी केले कौतुक, भाजप आमदारांच्या मागणीमुळे झाले निलंबन

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यात धार्मिक कार्यक्रम, लग्न सभारंभ, मिरवणूक यावर बंधने घालण्यात आले आहेत. काही राज्यात लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली असून मर्यादित लोकांच्या उपस्थित आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु काही लग्नसमारंभांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने कारवाई करण्यात येत आहे. असेच एक लग्न कार्य रात्रीचे सुरु असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या फौज फाट्यासह लग्न होत असलेल्या हॉलवर धाड टाकली. यावेळी रात्रीच्या संचारबंदी चे उल्लंघन आणि कोरोना नियमांचे उल्लंघनामुळे लग्न समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडींना आणि वधु-वर आणि जेवत असलेल्या लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानित करुन हाकलून लावले होते.

पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी एका लग्न कार्यालयावर धाड टाकून वधु-वर आणि वऱ्हाडींना अपमानित करुन हाकलून लावले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत असलेल्या पोलिसांनी वऱ्हाडींना लाठीमार केला असल्याचेही समजते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न कार्यालयावर धाड टाकून अपशब्द वापरत वधु-वरांच्या घरच्यांशी वाद घातला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संतापुन वऱ्हाडी मंडळींना बाहेर काढले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्रिपुरातील ५ आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलेल्य कृत्याविरोधात टीका आणि कारवाईची मागणी जोर धरु लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घडल्या प्रकराबाबत माफी मागितली आहे. तसेच याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडे घडल्या प्रकाराचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओत काय घडलंय

त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी लग्न कार्यावर केलेल्या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असे दिसते आहे की, लग्नसमारंभ सुरु असताना रात्रीच्या वेळी जिल्हाधिकारी आणि पोलीसांची फौज लग्नमंडपात येतात. यावेळी वधु-वर व त्यांच्या कुटूंबीयांशी हुज्जत घालत आहेत. नातेवाईकांनी लग्नासाठी काढण्यात आलेल्या परवानगीचे कागद पत्र जिल्हाधिकांऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ते कागद फाडून नातेवाईकांच्या अंगावर फेकले. व वधु वर त्यांच्या नातेवाईकांना अपमानित करुन बाहेर काढले यावेळी काही जणांना लाठीमार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी संतापून कारवाई करत होते. तसेच जेवण्यास बसलेल्या मंडळींना अर्ध्यातूनच उठवून बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमध्ये बाधा आणल्यामुळे एकुण ३० जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचे कौतुक

जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी केलेल्या धडक कारवईचे काही नेटकऱ्यांनी समाचार घेतला आहे तर काहींनी त्यांचे तोंडभर कौतुक केले आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी नातेवाईकांसोबत केलेल्या वागणुकीमुळे भाजपच्या पाच आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांचे निलंबणाचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री बिप्लव यांनी निलंबित केल्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी माफी मागितली आहे. कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने कारवाई केली असून कोणालाही दुःखावण्याचा हेतु नव्हता असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -