Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अतिक-अशरफच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचे मोठे वक्तव्य; युपीत आता माफिया...

अतिक-अशरफच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचे मोठे वक्तव्य; युपीत आता माफिया…

Subscribe

जे माफिया आधी राज्यासाठी संकट होते, आता ते स्वत: संकटात आहेत. आमच्या काळात उत्तर प्रदेशात एकदाही संचारबंदी लागलेली नाही. कोणत्याही रस्त्यावर आता भीती वाटत नाही. उत्तर प्रदेश आता विकासासाठी ओळखलं जातं. पूर्वी उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था खराब होती, असं योगी म्हणाले.

उत्तर प्रदेशात गुंडगिरीच्या माध्यमातून स्वत:चं आर्थिक व राजकीय साम्राज्य उभारणारा कुख्यात बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी रात्री प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. पोलिसांच्याच ताब्यात असताना हत्या झाल्याने, युपीतील कायदा प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.  (Chief Minister Yogi Adityanath big statement after Atiq-Ashraf’s murder Mafia now in UP will not forgive )

जे माफिया आधी राज्यासाठी संकट होते, आता ते स्वत: संकटात आहेत. आमच्या काळात उत्तर प्रदेशात एकदाही संचारबंदी लागलेली नाही. कोणत्याही रस्त्यावर आता भीती वाटत नाही. उत्तर प्रदेश आता विकासासाठी ओळखलं जातं. पूर्वी उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था खराब होती, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

जिथे रस्त्यांवर खड्डे दिसायला सुरुवात झाली तिथून उत्तर प्रदेशची सीमा सुरु झाली, असे पूर्वी म्हटलं जायचं. उत्तर प्रदेशची आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी आम्ही जोडली आहे, असंही ते पुढे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

अतिक अहमद आणि अशरफ अहमद याची शनिवारी हत्या करण्यात आली. या दोघांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना प्रयागराज येथील रुग्णालयात नेलं. रुग्णालयात जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अतिक आणि अहमदचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्ला करणारे दोघेजण आणि त्यांचा एक साथीदार पोलिसांना शरण गेले.

( हेही वाचा: “मला घेणार…नाही घेणार हे शिंदे गटाचे नेते का बोलतात?”, अजित पवारांचा संतप्त सवाल )

कोण होता अतिक अहमद?

गुंड अतिक अहमद हा 2005 मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. तसेच, अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisment -