घरदेश-विदेशराजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच, सचिन पायलट म्हणतात हायकमांडला निर्णय घेऊ द्या!

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच, सचिन पायलट म्हणतात हायकमांडला निर्णय घेऊ द्या!

Subscribe

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केल्याने राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपद रिकामी होणार आहे. त्याजागी सचिन पायलट यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, सचिन पायलट यांना अशोक गहलोत यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध दर्शवलाय. यावरून सचिन पायलट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हायकमांडला निर्णय घेऊ द्या, त्यानंतरच मी माझा निर्णय घेईन असं सचिन पायलट म्हणाले.

गटाच्या तब्बल ८२ आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. ८२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे. या बंडखोर आमदारांसोबत पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. या आमदारांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप; पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदाला गेहलोत समर्थक आमदारांचा विरोध

सचिन पायलट म्हणाले की, मी जयपूरमध्ये आहे. दिल्लीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हायकमांडच निर्णय घेईल. हायकमांडला त्यांचा निर्णय घेऊ दे, त्यानंतर मी माझा निर्णय घेईन”.

- Advertisement -

पायलटांनी घातल्या दोन अटी

२०२० च्या राजकीय संकटात सरकार वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना मुख्यमंत्री बनवावं, अशी पहिली अट आमदारांनी घातली आहे. तर जोपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही, तोपर्यंत आमदारांची बैठक बोलावू नये, अशी दुसरी अट ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा मोफत रेशन घेताय? सरकारने बदलले नियम

शशी थरूर उतरणार काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांनी 24 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागवला. त्यामुळे ते अधिकृतपणे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या G-23 गटातील प्रमुख सदस्य असलेल्या शशी थरूर यांनी या पदासाठी निवडणूक लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला. हे पद दीर्घकाळ गांधी परिवाराकडे आहे. गेल्या 25 वर्षांपासून अध्यक्षपद सोनिया गांधी किंवा त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मधुसूदन मिसरी यांच्याकडून उमेदवारी अर्ज घेण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी पाठवला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -