Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश child labour: जगभरात २० वर्षानंतर पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत वाढ, आफ्रिकेत सर्वाधिक...

child labour: जगभरात २० वर्षानंतर पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत वाढ, आफ्रिकेत सर्वाधिक संख्या

Related Story

- Advertisement -

ज्या वयात शिक्षण घेत स्वत:चे भविष्य उज्ज्वल करायचे असते अशा वयात लहान मुलांना घराच्या आर्थिक अडचणींमुळे काम करण्याची वेळ येत आहे. गरीबीमुळे शिक्षण न घेणारी मुले आज कामधंदा करत आपल्या गरजा भागवत आहेत. यामुळे अगदी कमी वयात काही लहान मुले जोखिमीचे उद्योग, चहाची टपरी, रस्त्यावर वस्तूची अशा यठिकाणी काम करताना दिसतात. भारतासह जगभरात अशा बाल कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. यातच गेल्या २० वर्षानंतर जगात पहिल्यांदाच बाल कामगारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनने जाहीर केली आहे. आज जगभरातील प्रत्येक १० मुलामागे १ मुलं कोणत्या ना कोणत्या ठिकाणी काम करत आहे. यात कोरोना संसर्गामुळे आज लाखो लहान मुले अडचणीत सापडली आहेत.

२०१६ नंतर सर्वात मोठी वाढ 

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी संघटनेने (UNICEF)यासंदर्भात सांगितले की, २०१६ मध्ये जगभरात बाल कामगारांची संख्या ही १५२ मिलियन(१५.२ कोटी) हून वाढून १६० मिलियन (१६० कोटी) इतकी झाली आहे. यात वाढती लोकसंख्या आणि गरीबीमुळे अफ्रिकेत आज सर्वाधिक बालकामगार आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेक लहान मुलांवर काम करण्याची वेळ 

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक हेनरीटा फोर यांनी १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या पूर्वी यावर भाष्य केले आहे. हेनरीटा म्हणाल्या की, बाल मजुरीविरुद्धच्या लढ्यात आपल्याला अपयश येत आहे. यात गेल्यावर्षी कोरोनामुळे ही लढाई अधिकच अवघड झाली आहे. यात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने आणि आर्थिक परिस्थिती आणखीनच ठासळत असल्याने अनेक कुटुंबातील लहान मुलांना बाल मजुरी करणे भाग पडले असेही त्या म्हणाल्या.

शाळा बंद असल्याने वाईट परिस्थितीत जास्तीत जास्त काम करतायंत मुलं 

यात २०२५ पर्यंत जगभरातील अनेक देशांमधील बाल मजुरांची संख्या संपुष्टात आणण्यासाठी आणि योग्य ती पावले उचलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०२१ हे वर्ष बाल निमुर्लनासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्षे जाहीर केले आहे. यावर संयुक्त राष्ट्राकडून असे मत नोंदविले की, कोरोना साथीच्या आजारामुळे आज जगभरात आर्थिक फटका सहन करणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांना शाळा बंद असल्याने जास्तीत जास्त तास वाईट परिस्थितीत काम करावे लागत आहे.

५ ते ११ वयोगटातील लहान मुलांची संख्या सर्वाधिक 

- Advertisement -

या अहवालात बालकामगारांतील ५ ते ११ वयोगटातील मुलांच्या संख्येत वाढ होण्यावर प्रकाश टाकणयात आला. कारण ५ ते ११ वयोगटातील बालकामगारांची संख्या जागतिक स्तरावर निम्म्यापेक्षा जास्त आहे. या बरोबरच धोकादायक ठिकाणी काम करणाऱ्या बालकांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यांचया आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार क्लाउडिया कप्पा म्हणाल्या की, रोजगारासाठी किमान वय निश्चित होईपर्यंत मोफत चांगल्या दर्जाचे शिक्षण दिल्यास जगातील बालकामगारांची संख्या १५ मिलियन (१.५ कोटी) पर्यंत कमी होऊ शकते.

शेती आणि ग्रामीण विकास झाल्यास ७० टक्के बालकामगार होतील मुक्त 

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गाय रायडर यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण विकास कामांत वाढती गुंतवणूक आणि शेतीकडे लक्ष दिल्य़ास जगात बालकामगारांची संख्या कमी होऊ शकते कारण य़ात बाल कामगारांचा ७० टक्के वाटा आहे. रायडर म्हणाले की नवीन अहवाल आम्हाला धोक्याचा इशारा देणार आहे. कारण नवीन पिढीच्या लहान मुलांचे आयुष्य धोक्यात येताना आपण पाहू शकत नाही. त्यामुळे आपल्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण क्षण आहे यावर आपण कसा प्रतिसाद देतो यावर बरेच काही अवलंबून आहे.


मालाड मालवणी येथे घर कोसळून ८ मुलांसह ११ जण मृत ; ७ जण जखमी


 

- Advertisement -