घरदेश-विदेशआईला प्रसुती रजा मिळावी म्हणून एक वर्षाच्या मुलाने केली याचिका; ११ मेरोजी...

आईला प्रसुती रजा मिळावी म्हणून एक वर्षाच्या मुलाने केली याचिका; ११ मेरोजी सुनावणी

Subscribe

 

नवी दिल्लीः आईला प्रसुती रजा मिळावी म्हणून एक वर्षांच्या मुलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या मुलाचा जन्म गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात झाला आहे. त्याच्या नावे ही याचिका करण्यात आली आहे. या याचिकेवर ११ मेरोजी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

त्रिग्यांश जैन असे या मुलाचे नाव आहे. त्याची आई अमिता जैन ह्या दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. १७ जानेवारी २०२२ रोजी त्रिग्यांंशचा जन्म झाला. अमिता जैन यांनी प्रसुती रजेसाठी पालिकेकडे अर्ज केला. पण त्रिश्यांग हे तिसरे अपत्य आहे. तिसऱ्या अपत्याच्या संगोपनासाठी प्रसुती रजा दिली जात नाही. त्यामुळे तुमचा अर्ज मान्य होणार नाही, असे दिल्ली पालिकेने अमिता जैन यांना कळवले.

त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात त्रिश्यांगच्या नावे याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत तिसऱ्या अपत्यासाठी प्रसुती रजा नाकारणाऱ्या केंद्र सरकारच्या नियमालाच आव्हान देण्यात आले आहे. केंद्रीय कर्मचारी नियमानुसार सरकारी महिला कर्मचाऱ्याला संगोपन रजा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे माझ्या आईला संगोपन रजा मंजूर करा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम तयार केले. या नियमानुसार तिसरे अपत्य झाल्यास त्याची नोंदणी केली जात नाही. त्याला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. सरकारी महिला कर्मचाऱ्याला संगोपन रजा दिली जात नाही. एवढचं काय तर तिसरे अपत्य असल्याची माहिती लपवून निवडणूक लढवली आणि निवडून आलात. ही बाब कोणाच्या लक्षात आली. एखाद्याने याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. तरी त्या लोकप्रतिनिधीचे सदस्यत्त्व रद्द होते.

केंद्र सरकारने तयार केलेल्या या नियमाची अमंलबजावणी देशातील सर्व राज्य, महापाालिका, नगरपालिका, नगरपंचायत व स्थानिक प्रशासन करते. या नियमाचा दाखला देत दिल्ली महापालिकेने अमिता जैन यांना संगोपन रजा नाकरली आहे. परिणामी या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -