अभ्यासाच्या नावाखाली मुलं पाहातायत पॉर्न, अहवालातून बाब उघड

children are watching adult content in mobile on name of study
अभ्यासाच्या नावाखाली मुलं पाहातायत पॉर्न, अहवालातून बाब उघड

कोरोना काळात इंटरनेटचा वापर वाढला आहे. सर्व काम इंटरनेटच्या माध्यमातून केली जात आहे. मग शाळा, कॉलेज असो किंवा खासगी आणि सरकारी कंपन्या. यादरम्यान एक नकारात्मक प्रभाव देखील वाढला आहे. काही सायबर फ्रॉड होत आहेत तर काही मुलं बिघडत आहेत. या नकारात्मक प्रभावामुळे समाजातील चिंता वाढली आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञ दीपक कुमार यांनी बाल संरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या गाईड चाईल्ड या झारखंड संस्थेच्या अहवालाचा हवाला दिला. त्यात म्हटले आहे की, ७० टक्के मुलं आपल्या मुलं वय वाढून अडल्ट साईट्सवर एन्ट्री करत आहेत. यानंतर ते अश्लील चॅट करत आहेत. तसेच अनेक अश्लील अॅपवर देखील मुलं वेळ घालवत आहेत.

अहवालानुसार, इंटरनेट मीडियावर ३० टक्के मुलं आठ तासांपेक्षा जास्त वेळ घालवत आहेत. २४ टक्के मुलांनी त्यांचे न्यूड फोटो आणि सेमी न्यूट फोटो शेअर केले आहेत. हे शेअरिंग अॅप व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्रामसह इतर अॅपवर शेअर करत आहे. ४६ टक्के मुलांनी अश्लील गोष्टी पाहण्यासाठी स्वीकार केल्या आहेत. एवढेच नाहीतर ६७ टक्के किशोरवयीन मुले आणि ६० टक्के मुली सोशल साइटवर पॉर्न पोस्ट करत आहेत. यामुळे लॉकडाऊनमध्ये मुलांचे मोबाईल वापरण्याचे प्रकार वाढले आहेत.

दीपक कुमार म्हणतात की, यामुळे सायबर क्राईम वाढत आहेत. मुलं सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य होत आहेत. अनेक गेमिंग अॅप्सच्यामाध्यमातून मुलांना प्यादे बनवून पैशांची फसवणूक केली जात आहे.

मुलं किती वेळ अडल्ट साईटवर घालवत आहेत….

      वेळ                                  टक्के
२ तास आणि त्यापेक्षा कमी          २० टक्के
२ ते ४ तास                            २४ टक्के
४ ते ८ तास                            ३५ टक्के
८ तासांहून अधिक                    ३० टक्के
अजिबात वापरत नाहीत               ६ टक्के