घरदेश-विदेशCorona Vaccination:12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना मिळणार ऑक्टोबरमध्ये पहिली लस

Corona Vaccination:12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना मिळणार ऑक्टोबरमध्ये पहिली लस

Subscribe

कोरोना व्हायरसचा(corona virus) प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण(vaccination) करण्यात येत असून आता 12 ते 18 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. भारतामध्ये झायडस कॅडिला कंपनीची झायको-डी ही लस येत्या ऑक्टोबर महिन्यात बाजारात येणार असून झायको-डी ही लस लहान मुलांना देण्यात येणार आहे. जगातील ही पहिली डिएनए कोरोना लस(covid-19) असल्याने ती अधीक गुंतागुतीची असल्याचे कळतेय तसेच ही लस बनवणे अधीक वेळखाऊपणाचे काम आहे अशी माहिती समोर येत आहे. यामुळे या लसीची किंमत देखील जास्त असून बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या तुलनेत जास्त किमतीची आहे. बाजारात कोव्हिशिल्ड लसीची किंमत 780 रुपये आहे. तर, कोवॅक्सिन 1410 रु, आणि स्पुटनिक लस 1145 रुयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी देशभरातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून सध्या बाजारपेठेत अनेक लसी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र लहान मुलांसाठी अद्याप एकही लस तयार झाली नाहीये या पार्श्वभूमीवर देशातील औषध नियंत्रण प्राधीकरणाने 20 ऑगस्टला झायडस कॅडिला या कंपनला तीन डोस असलेल्या लसीची निर्मिती करण्याची परवानगी दिली होती. झायको-डी ही लस 12 वर्षावरील वयोगटातील मुलांपासून ते 18 वर्षाच्या मुलांसाठी उपयोगी पडणार असून त्या पुढील वयोगटातील व्यक्तींनाही ही लस वापरण्यात येऊ शकते अशी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

देशाच्या जैवतंत्रज्ञान विभाग आणि आयसीएमआरच्या साहाय्याने झायको-डी ही लस तयार करण्यात आली आहे. तसेच लसीची चाचणी केल्यानंतर ही लस 66.6 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनी तर्फे करण्यात आला आहे. या चाचणीदरम्यान एकूण 28 हजार स्वयंसेवकांवर तसेच 12 ते 18 वयोगटातील सुमारे एक हाजार लहान मुलांवर याची तपासणी केली असून ही लस योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

डिएनए वॅक्सिन-

अनेकांना डिएनए वॅक्सिन म्हणजे काय असा प्रश्न पडला आहे. डीएनए वॅक्सिन किंवा लसमध्ये डीएनएमधील अत्यंत सूक्ष्म घटकाचा यात समावेश असतो आणि हा घटक माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला सर्व माहिती पुरवतो याद्वारे रोगजंतूशी सामना कसा करावा याचे प्रशिक्षण या लसीद्वारे शरीराला देण्यात येते.

- Advertisement -
महत्वाची माहिती-
  • झायको-डी ही लस 18 दिवसांच्या अंतराने घेता येणार असून याचे तीन डोस घेणं गरजेचं आहे.
  • यामुळे एका व्यक्तीचे लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होणार.
  • या डोसची नेमकी किंमत काय आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाहीये.

हे हि वाचा – कोरोनापाठापोठ आता डेंग्यूचा कहर, देशभरात १०० व्यक्तींचा मृत्यू

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -