Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दुसऱ्या विवाहातून जन्मलेल्या अपत्यालाही अनुकंपा तत्व लागू- उच्च न्यायालय

दुसऱ्या विवाहातून जन्मलेल्या अपत्यालाही अनुकंपा तत्व लागू- उच्च न्यायालय

दुसऱ्या लग्नातून अपत्य असल्याच्या कारणावरून संबंधितचा नोकरी मिळवण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही. असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Related Story

- Advertisement -

दुसऱ्या विवाहातून जन्मलेल्या अपत्यालाही पहील्या लग्नापासून झालेल्या अपत्याप्रमाणेच अधिकार मिळणार. असा महत्वपूर्ण निर्णय तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

तेलंगणामधील एका व्यक्तीचा जन्म दुसऱ्या लग्नातून झाला. यामुळे अनुकंपा तत्वावरील नोकरी त्याला नाकारण्यात आली होती. याविरोधात संबंधित व्यक्तीने न्यायालयात एक याचिका दाखल केली . त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

- Advertisement -

दुसऱ्या लग्नातून जन्माला आलेल्या अपत्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देता येत नाही असा कुठेही लिखित नियम आहे का? असे न्यायालयाने सरकारला विचारले. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाने याआधी अशाप्रकरणात दिलेल्या निर्णयाचा हवाला देत शरद याच्या नोकरीबाबतचा निर्णय घ्यावा. असेही न्यायालयाने सरकारला सांगितले. त्याचबरोबर केवळ दुसऱ्या लग्नातून अपत्य असल्याच्या कारणावरून संबंधितचा नोकरी मिळवण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही. असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -