Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE सावधान! १० वर्षांखालील मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

सावधान! १० वर्षांखालील मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

मार्च महिन्यात दहा वर्षाखालील ४७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशीतील कोरोनाची रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या विळख्यात सध्या दहा वर्षांखालील मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकच्या बंगळूरमध्ये दहा वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. २०२० पेक्षा २०२१ मध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण समोर येत आहेत. लॉकडाऊन दरम्यान मुले घरात होती. त्यामुळे कोरोनाचा धोका त्यांच्यापर्यंत पोहचू शकला नाही. मात्र आता मुले बाहेर फिरतात, खेळतात त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मार्च महिन्यात दहा वर्षाखालील ४७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात हा आकडा ५००च्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मार्च महिन्यात नोंद झालेल्या ४७२ रुग्णांमध्ये २४४ मुलांचा समावेश आहे तर २२८ मुलींचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे.कोरोनाचा हा वाढता प्रसार ही चिंतेची बाब आहे, असे कर्नाटकमधील अँडव्हायजरी कमिटीच्या सदस्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

लहान मुलांमध्ये सध्या गार्डनमध्ये खेळायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे फिरायला जाणे इतर मुलांमध्ये मिसळणे या सर्व गोष्टी मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. त्याचप्रमाणे लहान मुले व्यवस्थित मास्क घालत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. पालकही मुलांना सणसमारंभ लग्नासोहळ्यासाठी घेऊन जातात. गर्दीच्या ठिकाणी मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतो ही सर्व कारणे मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत असल्याचे अँडव्हायजरी कमिटीच्या सदस्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – Lockdown: कोरोनाचा कहर! औरंगाबाद पुन्हा लॉकडाऊन

 

- Advertisement -