घरताज्या घडामोडीलहान मुले कोरोनाचे स्प्रेडर नाहीत, नवीन संशोधन समोर

लहान मुले कोरोनाचे स्प्रेडर नाहीत, नवीन संशोधन समोर

Subscribe

लहान मुलांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे पालकांमध्ये एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलेही कोरोनाच्या संक्रमणाचा शिकार ठरत असल्याची आकडेवारी समोर आल्याने अनेक कुटूंबांच्या चिंतेत भर पडली होती. पण नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनामुळे लहान मुलांच्या बाबतीत कोरोनाची चिंता कमी होण्यासाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे,असेच म्हणता येईल. नव्या संशोधनानुसार लहान मुले ही कोरोनाचा प्रसार करत नाही त्यामुळे लहान मुले ही कोरोनाची स्प्रेडर नाहीत, असे संशोधन समोर आले आहे. सध्या जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरणारा SARS-CoV-2 कोरोना व्हायरचा प्रसार होण्यामध्ये लहान मुलांकडून हा प्रसार होत नाही असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कॅनडाच्या एका विद्यापिठामधील संशोधनकाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार लहान मुले ही कोरोनाची वाहक नाहीत असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

काय आहे संशोधन ?

कॅनडाच्या युनिवर्सिटी ऑफ मॅनिटोबा येथील जेरड बुलार्ड यांनी केलेल्या अभ्यासानुसार लहान मुलांच्या बाबतीत झालेले संशोधन हे सार्वजनिक आरोग्यात मोठा दिलासा देणारे असे आहे. लहान मुले ही कोरोनाची वाहक नाहीत. म्हणूनच डेकेअर, शाळा आणि इतर अॅक्टीव्हिटीमध्ये लहान मुलांचा सहभाग असणे ही सुरक्षित बाब आहे. योग्य ती काळजी घेतल्यास लहान मुले आणि त्यांच्यासोबतचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून शैक्षणिक गोष्टी सुरू ठेवण्यास हरकत नाही, असे संशोधनातून मांडण्यात आले आहे. या संशोधनासाठी जवळपास १४ संशोधकांच्या टीमने १७५ लहान मुलांचा आणि १३० प्रोढांचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी ज्यांना कोरोनाच्या विषाणूची लागण झाली आहे, अशा रूग्णांचा समावेश करण्यात आला होता. वेगवेगळ्या वयोगटातील मुले आणि प्रौढ व्यक्ती निवडण्यामध्ये त्यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग किती होतो ही बाब शोधणे होता. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जरनलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासासाठी छोट्या मुलांचा आणि प्रौढांचा नाकावाटेचा स्वॅब घेण्यात आला. लहान मुले कोरोनाचा प्रसार करतात का याची पडताळणी करणे संशोधनाचा हेतू होता.

- Advertisement -

या संशोधनातील माहितीनुसार लहान मुलांकडून कोरोनाचा प्रसार कमी होतो आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुले ही कोरोनाचा प्रसार करत नाहीत. म्हणूनच लहान मुलांशी संबंधित शाळा, डेकेअर आणि इतर अॅक्टीव्हिटी या योग्य ती खबरदारी घेऊ सुरू करायला काहीच हरकत नाही. प्रोढांच्या तुलनेत लहान मुलांकडून कोरोनाचा प्रसार कमी होत असल्यानेच लहान मुलांच्या बाबतीत कोरोनाशी संबंधित गोष्टींची काळजी घेऊन गोष्टी सुरू करण्यात हरकत नाही, असे संशोधकांनी अभ्यासातून स्पष्ट केले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -