पहा व्हायरल व्हिडिओ : माकडाच्या हातात AK 47, केली मिस्फायरींग…

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून हसायला तर येतच पण प्राण्यांची चेष्टा करणं किती महागात पडू शकतं हे देखील कळतं.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून हसायला तर येतच पण प्राण्यांची चेष्टा करणं किती महागात पडू शकतं हे देखील कळतं. या व्हिडीओमध्ये जंगलात एक टोळकं चिंपांझी माकडाबरोबर मस्ती करत असल्याचे दिसत आहे. तर काहीजण नाचत आहेत. त्याचवेळी त्यातील एकजण मस्करीत माकडाच्या हातात एके ४७ देतो. माकडाच्या हातात बंदूक बघून सगळेजण हसत आहेत. तर अचानक हातात बंदूक आल्याने क्षणभर माकड बुचकळ्यात पडतो. पण दोनजण त्याला नाचता नाचता फायरिंग कसं करायचं ते दाखवतात. त्यानंतर मात्र माकड थेट टोळक्यावरच फायरिंग करत असल्याचं व्हिडीओत दिसतय.

याप्रकारमुळे टोळक्याची पुरती दाणादाण उडते व ते जीव वाचवण्यासाठी धावू लागतात. वन अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मिडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.