घरताज्या घडामोडीCOVID-19 third wave in China : चीनमध्ये कोरोना आऊटब्रेक ! फ्लाईट्स रद्द,...

COVID-19 third wave in China : चीनमध्ये कोरोना आऊटब्रेक ! फ्लाईट्स रद्द, Lockdown अंमलात

Subscribe

६० टक्के फ्लाईट्स रद्द

चीनमध्ये परतलेल्या कोरोनाने जगभरातील देशांची चिंता वाढवील आहे. चीनमध्ये सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता आता चीन सरकारने तातडीने पावले उचलायला सुरूवात केली आहे. आपत्कालीन उपाययोजनांचा भाग म्हणूनच आता चीनमध्ये फ्लाईट्स रद्द केल्या जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्यचे संकेत दिले जात आहेत. जगभरात चीनमधूनच कोरोना व्हायरसचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले होते. पण आता चीनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे.

पुन्हा कोरोना आऊटब्रेकचे कारण काय ?

चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरात कोरोनाचे संक्रमण हे अतिशय वेगाने पसरत आहे. चीनमध्ये बाहेरून आलेले प्रवासी या कोरोनाच्या आऊटब्रेकसाठी कारणीभूत असल्याचे चीनमधील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून आता तातडीने उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणूनच चीनने मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करायला सुरूवात केली आहे. त्याशिवाय टूरिस्ट स्पॉटदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संक्रमण होऊ शकणाऱ्या संभाव्य जागांवरही पुन्हा टाळा लागला आहे. तर काही ठिकाणी मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

चीनमध्ये ६० टक्के फ्लाईट्स रद्द

चीनमध्ये लांझोऊ क्षेत्रात प्रशानाने लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी आपले घर सोडू नये. तसेच जे लोक घरातून बाहेर पडत आहेत. त्यांना कोविडच्या निगेटिव्ह रिपोर्टसह बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिआन आणि लांझोऊ या क्षेत्रात जवळपास ६० टक्के फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. मंगोलिया क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे कोळशाच्या आयातीवरही परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जगभरात कोणत्या देशात कोरोनाने डोक वर काढलं ?

चीनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये फक्त १३ कोरोना रूग्णांची संख्या समोर आली आहे. पण या आकड्यानंतर चीन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करायला सुरूवात केली आहे. चीनच्या या वेगवान हालचालीने जगभरातील देशांचे टेन्शन वाढवले आहे. कोरोनाच्या महामारीच्या सुरूवातीच्या काळात ज्या पद्धतीने चीनने हालचाली केल्या होत्या, त्यानुसारच आता संपुर्ण उपाययोजनांना सुरूवात झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामध्ये रूस, अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली पहायला मिळत आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -