China Artificial Sun : चीनने बनवला ‘मेड इन चायना सन’; वाचा काय होणार फायदा?

सूर्य म्हटलं की उर्जेचा प्रचंड स्त्रोत . दोन सूर्याच्या कल्पना ह्या अनेकदा केल्या जातात.सध्या जगभरामध्ये चीनने केलेल्या संशोधनाची चर्चा सुरु आहे. यावेळी चीनने कृत्रिम सूर्याचं संशोधन केलं आहे. चीनचा ऊर्जा निर्मिताचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

China Artificial Sun: Made in China Sun by China; Read What will be the benefit?
China Artificial Sun : चीनने बनवला 'मेड इन चायना सन'; वाचा काय होणार फायदा?

जगभरात संशोधक हे वेगवेगळे संशोधन करुन जगाला एक पाऊल पुढे ठेवत असतात. संशोधकांप्रमाणेच सामान्य नागरिकांना अंतराळातील अनेक गोष्टींचे कुतूहल हे सामान्य लोकांनाही असते. सूर्य म्हटलं की उर्जेचा प्रचंड स्त्रोत. दोन सूर्याच्या कल्पना ह्या अनेकदा केल्या जातात. सध्या जगभरामध्ये चीनने केलेल्या संशोधनाची चर्चा सुरु आहे.
यावेळी चीनने कृत्रिम सूर्याचं संशोधन केलं आहे. चीनचा ऊर्जा निर्मिताचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतकंच नाही तर या सूर्यापासून त्यांनी अधिक ऊर्जा मिळण्यास सुरूवात केली आहे. मात्र आता तुम्ही विचारात पडला असला की आता दोन सूर्य तयार झाले असून, ग्रहमालिकेत दोन दोन सूर्य असतील तर दिवस रात्र कसे होणार असे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील.चीनने तयार केलेला सूर्य हा एखाद्या ग्रहाप्रामाणे नसून हा कृत्रिम सूर्य तयार केला आहे.

देशातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होण्याचा तयारीत असलेला चीनने एक वर्ल डेकॉर्ड तयार केला आहे.चीनने कृत्रिम सूर्य तयार केला आहे. ऊर्जा निर्मितीसाठी तयार केलेला हा सूर्य याआधीही अँक्टीवेट केला गेला होता.मात्र 30 डिसेंबरला न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्टर मधून 17 मिनिटांमध्ये 7 कोटी अंश सेल्सिअस उर्जा उत्सर्जित करण्यात आली.दरम्यान इतक्या कमी वेळात निर्माण झालेली ही उर्जा खऱ्या सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेपेक्षा जास्त होती.त्यामुळे हा प्रयोग आता यशस्वी मानला जातोय.

यापूर्वी याच कृत्रिम सूर्याच्या माध्यमातून 1.2 कोटी अंश उर्जा उत्सर्जित झाली होती.त्यावेळी संपूर्ण जगभरात याची चर्चा झाली. मात्र आता चीनने केलेल्या या प्रयोगामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.हेफेई इन्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेस कडून एक्सपेरिमेंटल अॅडव्हान्स सुपरकंडक्टिंग टोकामाक प्रोजेक्ट सुरू केला. इथे हायड्रोजनचा साहाय्याने हेलियम तयार करण्यात येते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. तर चीनने बनवेला हा सूर्य उगवणार नसून या सूर्याचा उपयोग औद्योगिक प्रकल्पासाठी  करण्यात येणार आहे.या कृत्रिम सूर्याचा वापर आगामी काळात चीन कशाप्रकारे करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर, भारताचे स्थान धोक्यात