घरदेश-विदेशचीनने अवघ्या २८ तासांत बांधली १० मजली इमारत

चीनने अवघ्या २८ तासांत बांधली १० मजली इमारत

Subscribe

या इमारत बांधणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

चीनने अवघ्या २८ तासात १० मजली इमारत उभी करण्याचा विक्रम केला आहे. चीनच्या चांग्शा शहरात ही इमारत बांधण्यात आली आहे. या इमारत बांधणीचा व्हिडिओ यूट्यूबवर १३ जूनला टाकण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पाच मिनिटाच्या व्हिडिओत इमारत बांधणीची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. चीनमध्ये एका कंपनीने २८ तास आणि ४५ मिनिटात १० मजली इमारत उभारली आहे. ब्रॉड ग्रुपने ही कामगिरी केली आहे. या इमारत उभारणीसाठी डेव्हलपर्सने ‘लिव्हिंग बिल्डिंग सिस्टम’चा वापर केला आहे. बोल्ट आणि मॉड्यूलरच्या सहाय्याने ही इमारत उभारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -