चीनमध्ये भीषण रस्ते अपघात; बस उलटल्याने 27 ठार, 20 जखमी

china bus overturned on highway in china 27 dead

चीनमधून एक भीषण रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे. चीनच्या नैऋत्य भागातील सॅंडू काउंटीमध्ये एक्स्प्रेस वेव बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 27 जण ठार झाले असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातादरम्यान बसमध्ये 47 प्रवासी प्रवास करत होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली आहे. यांच्या मार्फत मदत कार्य सुरु असून पुढील कारवाई सुरु आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आता रुग्ण वाहिकांची मदत घेण्यात आली आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

गुईझौ प्रांताची राजधानी गुईयांग शहराच्या आग्नेयेकडील सॅंडू काउंटीमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. अपघातीवेळी बसमधील 47 पैकी 27 जण ठार झाले आणि 20 प्रवासी गंभीर जखमी झालेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अन्य कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


‘ब्रह्मास्त्र’चा बॉक्स ऑफिसवर जोरदार कल्ला; जगभरातून केला 300 कोटींचा टप्पा पार